महाराष्ट्राच्या कणाकणाशी
इमान राखायचे आहे.
त्याग, शौर्य अन् क्रांतीचे निशाण
जगी फडकवायचे आहे.
नको गुलामी अविचारांची.
विचारांनी प्रेरित व्हायचे आहे.
महाराष्ट्र भूमी शपथ तुझी मला
नाव तुझे अटकेपार न्यायचे आहे.
अर्नदिप
इमान राखायचे आहे.
त्याग, शौर्य अन् क्रांतीचे निशाण
जगी फडकवायचे आहे.
नको गुलामी अविचारांची.
विचारांनी प्रेरित व्हायचे आहे.
महाराष्ट्र भूमी शपथ तुझी मला
नाव तुझे अटकेपार न्यायचे आहे.
अर्नदिप
स्वतः च्या मनाशी तरी प्रामाणिक राहावं.
स्वतः च्या चुकांची कबुली
किमान स्वतः ला तरी देऊन पहावं.
स्वतःच बनावं स्वतः च टीकाकार
अन् माझं काय चुकतय हे स्वतः लाच विचारावं.
आपल्याच चुकांची कबुली
कधीतरी स्वतः लाच देऊन पहावं.
तेव्हा कुठं विचार बदलेल.
विकृतीच्या जाळ्यातून मन
आपोआप बाहेर निघेल.
अर्नदिप
दुसऱ्यांदा तीच चूक झाली तरी चूकच म्हणावं.
तिसऱ्यांदा तीच चूक झाली तर मात्र तो गुन्हा.
पुन्हा पुन्हा जर तीच चूक झाली तर तो अपराध
आणि चूक समजूनही मुद्दाम स्वतः च्या वैयक्तिक स्वार्थासाठी तीच चूक पुन्हा पुन्हा करणं म्हणजे महापाप.
आणि या पापाची बोचणी मनातून आतून सलतेच.
आणि नियती ही याचा फटका देतेच.
ती कुणालाच माफ करत नाही.
अर्नदिप
पुढे जात राहायचे.
आभाळ असू दे किती ही लांब
त्याला मुठीत घेऊनच थांबायचे.
अर्नदिप
स्वतः च सुख का शोधावं?
आपल्या आपल्या आभाळातच
प्रत्येकाने आपलं आपलं सुख शोधावं.
अर्नदिप
ज्याचं त्याचं हक्काचं पिंपळपान असावं.
मनाच्या खोल तळाशी त्याला
हळूवारपणे जपावं.
अर्नदिप
रोजच चालू असतो.
संयमाने आणि आत्मविश्वासाने वागणाराच
या खेळात जिंकतो.
अर्नदिप
यशाच्या शिखरावर जाऊन बसण्यापेक्षा.
स्वकर्तुत्वावर मिळवलेल्या यशाचा
एक कवडसा लाख मोलाचा असतो.
अर्नदिप
आता काढायची आहे.
झरा शोधण्या आनंदाचा
दूर चालायचे आहे.
जिद्द मनात ठेऊन
टाक पाऊल तू पुढे.
उलगडेल आपोआप
तुला पडलेले कोडे.
अर्नदिप
पडला लख्ख तो प्रकाश.
नजरेच्या टप्प्यात आले
आता अवघे ते आकाश.
गेली निघून वादळे अन्
आसमंत अवघा शांत झाला.
क्षतिजा पल्याड चा तो गोळा
आज अचानक हाती आला.
भयभीत होती पृथ्वी
ती ही आता शांत झाली.
यशाच्या सोनेरी किरणांनी
रात्र अवघी जाग वली
अर्नदिप
घायाळ वेदनांना
पंख दिले तू.
मुक्या भावनांना
शब्द दिले तू.
भीम राया ,भीम राया
माझा भीम राया, भीम राया.
अन्याया विरूद्ध
आवाज उठविला.
जनतेचा केला
श्वास मोकळा.
उंच उभारी घेण्या
दिली प्रेरणा.
भीम राया.....
दीन दलितांचा
तू रे कैवारी.
तुझ्या कृपेने
सुटली चाकरी.
आभार मानण्या तुझे
हा शब्द अपुरा.
भीम राया.....
देश क्रांतीची
मशाल पेटली.
उरा मधे सदैव
दिसे प्रगती.
तुझ्या साथीने
हा देश मुक्त झाला.
भीम राया.......
देशसेवेचे व्रत घेतले.
उरी क्रांतीचे रान उठले.
तुझ्या मुळे आम्हां
नवी दिशा भेटली.
भीम राया......
परतुनी ये पुन्हा
जन्म घे नवा.
जागव पुन्हा त्या
नवचेतना.
नव क्रांतीची मशाल
पुन्हा पेटू दे मनी.
भीम राया......
सौ. आराधना गुरव
काव्य संग्रह
श्वास
अंत बघत असतो आपल्या सहनशक्तीचा.
तेव्हा संयमाने लढा देऊन
झेंडा फडकवायचा असतो यशाचा.
अर्नदिप
अंगणी आनंदाची फुगडी.
सार्थक आयुष्याचे व्हावे.
नव वर्षात घरी तुमच्या
आनंदाला उधाण यावे.
सरावीत सारी दुःखे
अन् चेहऱ्यावर फक्त हसू खुलावे.
जगभरातील साऱ्या सुखांनी
तुमच्या अंगणीचा दास व्हावे.
अर्नदिप
खंबीरपणे पुसून टाकायच्या.
नव्या रस्त्यावर फक्त यशाच्या
पाऊलखुणाच उमटवत रहायच्या.
अर्नदिप
तो काही केल्या परत येत नाही.
जसं अग्नीत होरपळून गेलेलं बीज
कुठल्याच मातीत पुन्हा रुजत नाही
अर्नदिप
अवघड कोडीही सहज सुटत जातात.
आयुष्याच्या आभाळात आनंदाचे पक्षी
पुन्हा नव्याने गाणी गाऊ लागतात.
अर्नदिप
या भावना मनातून उखडून काढायच्या.
प प्रेमाने मनं जिंकून
सुगंधी स्मृती गोळा करत रहायच्या.
अर्नदिप
येतात आणि निघूनही जातात.
मात्र मनाशी जोडलेल्या नाळेने
शेवटपर्यंत ती अभंग राहतात.
मनातील नाळ त्याची तुटता तुटत नाही.
नात्यामधल्या अभंगतेची यापेक्षा वेगळी पोहोच पावती नाही.
अर्नदिप
झोळीत यांच्या पडावं.
माझ्या गालावरचं हसू
ओठी यांच्या फुलाव.
भूक भागावी मायेची
अन् पडावा प्रेमाचा पाऊस.
या लेकरांना ही वाटावी
आयुष्य जगण्याची हौस.
अर्नदिप
अन् कधी कधी धुकं ही दाटून येतं.
भावनांच्या कोंडमाऱ्यात तेव्हा
जोडलेलं नातही गोठून जातं.
वाट बघत राहायची मग
आभाळ लख्ख होण्याची.
तेव्हा कुठे जाणीव होते
मनाला मनाची.
अर्नदिप
मनही रित होऊ पहात.
अशावेळी काय करायचं?
तर पोकळी निर्माण झालीच नाही असं समजायचं
म्हणजे पोकळी भरून काढण्याची गरज भासत नाही.
आणि मनही रीत होत नाही.
अर्नदिप