Wednesday, April 14, 2021

प्रकाश


 अंधार तो निमाला

पडला लख्ख तो प्रकाश.

नजरेच्या टप्प्यात आले

आता अवघे ते आकाश.

गेली निघून वादळे अन्

आसमंत अवघा शांत झाला.

क्षतिजा पल्याड चा तो गोळा

आज अचानक हाती आला.

भयभीत होती पृथ्वी

ती ही आता शांत झाली.

यशाच्या सोनेरी किरणांनी

रात्र अवघी जाग वली

                           अर्नदिप

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही