एखाद्या वेळी चुकून चूक झाली तर ती चूक.
दुसऱ्यांदा तीच चूक झाली तरी चूकच म्हणावं.
तिसऱ्यांदा तीच चूक झाली तर मात्र तो गुन्हा.
पुन्हा पुन्हा जर तीच चूक झाली तर तो अपराध
आणि चूक समजूनही मुद्दाम स्वतः च्या वैयक्तिक स्वार्थासाठी तीच चूक पुन्हा पुन्हा करणं म्हणजे महापाप.
आणि या पापाची बोचणी मनातून आतून सलतेच.
आणि नियती ही याचा फटका देतेच.
ती कुणालाच माफ करत नाही.
अर्नदिप

No comments:
Post a Comment