Sunday, February 28, 2021

सोबत


 किती येतील किती जातील

जे खरेच आपले असतील

तेच खरेतर शेवटपर्यंत

आपल्या सोबत राहतील.

Saturday, February 27, 2021

माती


 माती आणि माणसांच्यात

सहजतेने एकरूप व्हाव.

जसं बघता बघता कळीचं

अलगद फूल व्हाव.

Wednesday, February 24, 2021

सावली


 तुझ्या सावलीत माझी 

सावली हरवून जाते.

तुला मोठं होण्यासाठी

जणू मी छोटीच राहते.

Sunday, February 21, 2021

तुळस


 अंगणातील तुळस

जसजशी बहरते.

गोड संसाराच गुपीत

साऱ्या जगाला कळते.

Friday, February 19, 2021

आयुष्य


 साज, सुर,ताल,लय

सारं सारं जमून जातं.

विश्वासाच्या धाग्यांनी जेव्हा

आयुष्य हसू लागतं.

Thursday, February 18, 2021

जय शिवराय


 नतमस्तक मी त्यांच्या चरणी.

ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती.

भगव्याचा राखून मान.

वाढवू स्वराज्याची शान.

शिवराय आम्हाला तुमची आन.

आमचा तुम्ही अभिमान.


Wednesday, February 17, 2021

दगड


 डोक्यामध्ये दगड घालून

सगळेच दगड फुटतं नसतात.

काही दगड प्रेमाच्या, मायेच्या

हळूवार फुंकरीने सुद्धा,

धडाधड कोसळून पडतात.

Sunday, February 14, 2021

स्वप्न


 वाटेत काटे येतंच राहणार

त्यांना अलगद बाजूला सारायच.

त्यांना न घाबरता स्वप्नांवर विश्वास ठेऊन

पुढे चालत राहायचं


Saturday, February 13, 2021

श्वास


 माझ्यात रूजण्या आधी मी

तुझ्यात रुजून जावे.

गीत बनावे श्वासाचे अन्

हृदयाने मंद सूर छेडावे.

धडधडावे ह्र्दयात तुझ्या

लकेर बनुनी प्रेमाची.

प्रत्येक क्षणी चाहूल लागावी,

तुला माझी अन् मला तुझी.

Thursday, February 11, 2021

बीज


 माणसाने कसं बिजासारखं

मातीत पटकन रूजाव.

समोर कोणी का असेना

त्याला फळ रूपाने 

दानच देत जावं

Monday, February 8, 2021

उधाण


 अल्लड, उधाण वाऱ्याबरोबर

मंद झुळूक होऊन वहावं.

पोटातलं दुःख जसं सागरान

आतल्या आत  गिळावं.

      आराधना


Sunday, February 7, 2021

नदी

नदीसारखं खळखळ खळखळ

वाहता आलं पाहिजे.

मनातलं दुःख मनात ठेऊन

आयुष्य जगता आलं पाहिजे.

                      आराधना

Saturday, February 6, 2021

आयुष्य


 अवखळ अल्लड वाऱ्यासारखं

आयुष्य मस्त जगायचं.

बेभान होऊन आयुष्यातील,

आनंद शोधत राहायच.

                      आराधना

Friday, February 5, 2021

विश्वास


 विश्वास आणि संयम असला की

अवघड कोडी ही सहज सुटत जातात.

एकात एक गुंतलेल्या गाठी ही ,

सहजतेने उलगडत जातात.

               आराधना


Thursday, February 4, 2021

वेगळी वाट


 काही वाटा येतात आयुष्यात

ज्या आपल्या नसतात च कधी.

पण आपली वेगळी वाट शोधण्याची

हीच तर असते खरी संधी.

                   आराधना

Wednesday, February 3, 2021

झाड


 झाडासारखं आयुष्य

थोडं माणसांनही जगावं.

ऊन,वारा, पावसात ही त्याला,

दुसऱ्याला सुखच देता यावं.

                      आराधना

               

Tuesday, February 2, 2021

आभाळ


आभाळाचं काय घेऊन बसलात

सगळं अवकाश हातात येईल.

फक्त प्रयत्न करत राहा.

साऱ्या जगांन कौतुक करावं इतकं

यश नियती नक्कीच तुमच्या ओंजळीत टाकील.

                                   आराधना

Monday, February 1, 2021

ज्योत

 हरले असेल कैकदा पण


पेटून पुन्हा उठते.

एक इवलिशी ज्योत मिणमिणती

मार्ग यशाचा दावते..

              आराधना

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही