Thursday, April 29, 2021

चूक


 जगाशी प्रामाणिक राहता आलं नाही तरी.

स्वतः च्या मनाशी तरी प्रामाणिक राहावं.

स्वतः च्या चुकांची कबुली

किमान स्वतः ला तरी देऊन पहावं.

स्वतःच बनावं  स्वतः च  टीकाकार

अन् माझं काय चुकतय हे स्वतः लाच विचारावं.

आपल्याच चुकांची कबुली

कधीतरी स्वतः लाच देऊन पहावं.

तेव्हा कुठं विचार बदलेल.

विकृतीच्या जाळ्यातून मन

आपोआप बाहेर निघेल.

                        अर्नदिप

      

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही