Wednesday, September 30, 2020

काटा


 चालायचं पुढं

मागे वळून नाही बघायचं

काट्या प्रमाणे टोचनाऱ्या लोकांना

अलगद बाजूला सारायचं.

                     आराधना

Tuesday, September 29, 2020

संवाद


 संवाद भावनांचा 

भावनांशी घडावा.

तेव्हा कुठं होतो

माया, ममतेचा शिडकावा.

            आराधना.

Monday, September 28, 2020

स्वप्न

 स्वप्नातल्या पऱ्या सत्यात कधीच येत नसतात.

आकाशातील चांदण्या हातात कधीच मावत नसतात.

स्वतः च बनायचे परी अन् फिरवायची जादूची छडी.

यशाचं शिखर गाठण्यासाठी चढायची प्रयत्नांची शिडी.

                               आराधना गुरव.

Sunday, September 27, 2020

यश

पाऊल टाक पुढे

तू माग राहू नकोस.

निराशेच्या वादळात

वाहात जाऊ नकोस.

ठेव विश्वास स्वतः वर

अन् पाठलाग कर स्वप्नांचा.

एक दिवस नक्की उघडेल

मार्ग तुझ्या यशाचा.

मार्ग तुझ्या यशाचा.

आराधना

Saturday, September 26, 2020

वादळ

 वादळ येताना शांत येत.

अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करून जात.

वादळ येणारच, येत राहणारच.

वादळ आल्यावर मग काय करायचं.

  खाली वाकून नमस्कार करून

शांत उभ राहायचं.

आलेलं वादळ ही मग शांत होत.

डोक्यावर हात ठेवून दुसरीकडे निघून जातं.

आराधना

Friday, September 25, 2020

वेदना

 साद द्यावी भावनांना

वाट द्यावी हुंद क्याना

काळीज चिरणाऱ्या जखमां नो

मी सज्ज आहे.

कवेत घेण्या वेदनांना

कवेत घेण्या वेदनांना.

  आराधना

Thursday, September 24, 2020

हरलो आज जरी मी

 हरलो आज जरी मी

जिंकेन उद्या मीच

राखेतूनी पुन्हा नव्याने

उड्डाण करेन मीच

हाती घेतली आज

धगधगती मी मशाल

वन व्यातूनी आस वांच्या

बन वेन गीत मीच

  आराधना.

Wednesday, September 23, 2020

माणसं

 साथ देतात ती माणसं.

वाट अडवतात ती माणसं.

साद घालतात ती माणसं.

फायदा घेतात ती ही माणसं.

न मागता मदत करतात ती माण सं

अडचणीत पळून जातात तीही माणसं.

माणसा माणसात ला हाच फरक ओळखायचा.

माणसातल्या माणसासाठी आपला अमूल्य वेळ द्यायचा.

   आराधना.






 

आयुष्य

 आयुष्याच्या रंगमंचावर कोणतंच नातं दीर्घकाळ टिकत नाही

आपलं माणूस निघून गेल्यावर हाती काही च उरतं नाही.

       आराधना

Tuesday, September 22, 2020

जीवन

 जीवन रुपी आयुष्याची

नौका सरळ चालत नाही

खाली पडून उठल्याशिवाय

आयुष्याची मजा येत नाही.

             आराधना

Monday, September 21, 2020

एक दिवस

 एक दिवस असा, एक दिवस तसा.

कोणत्याच दिवसाचा. नाही कायमचा भरवसा

विश्वास ठेवा स्वतः वर.काम  करा नेटाने.

आयुष्य भरून जाईल सुखाच्या क्षणाने.

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही