Tuesday, November 30, 2021

वेळ


 पडल्यावरही उठायला शिकता यायला हवं.

सांडलेल वेचत बसण्यापेक्षा मुठीत राहिलेलं

जपता यायला हवं.

वेळ निघून जाण्यासाठीच येतं असते

म्हणून तर प्रत्येक क्षणी आनंदाचं गाणं गाता यायला हवं

Monday, November 29, 2021

आशावाद


 आधारासाठी ज्या हातांकडे

आशेने हात मागावा

त्या हातांनीच हात अखडता घ्यावा

अशा वेळी मग आपणच आपल्या मनातील अन् मनगटातील जोर वाढवावा

अन् इतरांना आधार देता येईल इतका

आशावाद आपणच आपल्यात निर्माण करावा

Sunday, November 28, 2021

पालवी


 उभं राहायचचं मनात असेल तर

सुरवात कुठूनही आणि कधी ही करता येते.

जळालेल्या अवस्थेत ही मग

अलगद एखादी पालवी

पुन्हा नव्याने जन्म घेते

Saturday, November 27, 2021

महात्मा जोतिबा फुले


 शतकांचा अंधार दूर झाला

स्त्री शिक्षणाचा मार्ग खुला केला.

न्याय, निती अन् स्वाभिमानाने 

जूलमी राजवटी विरूद्ध लढा दिला.

विद्येची मशाल हाती दिलीत आमुच्या

स्त्री शिक्षणाचे जनक जोतिबा तुम्हाला

आमचा मानाचा मुजरा


Friday, November 26, 2021

पानगळ


 पानगळ झाली म्हणून

रूसून का बसायचं?

वसंताच्या आगमनासाठी

पुन्हा नव्याने सज्ज व्हायचं

वसंतातील प्रत्येक क्षणी

नवचैतन्याने पुन्हा न्हाऊन निघायचं


Thursday, November 25, 2021

शब्द


 शब्दांच अन् आपलं नात

इतकं घट्ट असावं की

शब्दांनीच आपलं उत्तर दायी व्हावं.

आपल्या नंतरही आपण

शब्द रूपानेच उरावं


Wednesday, November 24, 2021

झरा


 आपल्या अंतरंगातील आनंदाचे मूकझरे

आपले  आपणच शोधावे.

कोसळणाऱ्या त्या धबधब्याखाली

भिजण्यातील नवचैतन्य मग

आपलं आपणच अनुभवावे

Tuesday, November 23, 2021

चटका


 ऊन लागतंय म्हणून

सारखं सावलीतूनच का चालायचं.

त्यापेक्षा उन्हातूनच चालून

प्रत्येक चटका सहन करण्या इतकं सामर्थ्य

आपणच आपल्यात निर्माण करायचं

Monday, November 22, 2021

कवडसा


 भोवताली नसला प्रकाश जरी

तूच तुझ्यासाठी कवडसा व्हावा

तुझ्याच प्रकाशाने मग

सारा आसमंत उजळून निघावा


Sunday, November 21, 2021

झेप


उंच झेप घ्यायची असेल तर

पावलं हळूवारच टाकायला हवीत.

प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करूनच

भविष्यातील आव्हानं पेलायला हवीत

Saturday, November 20, 2021

सामर्थ्य


सामर्थ्याने पंख पसरले की

आभाळ देखील मुठीत घेता येतं.

न सुटलेल्या कोड्याच गणित ही

चुटकीसरशी सोडवून देतं

Friday, November 19, 2021

ध्येय


 ध्येय इतुके उत्तुंग असावे की

क्षितिजानेही कवेत घ्यावे.

आत्म सन्मानाने जगता जगता

आयुष्याचे सोने व्हावे


Thursday, November 18, 2021

क्षितिज


 नजरेत माझ्या फक्त आता

ते क्षितिज दिसते आहे.

प्रयत्नांच्या पाऊलखुणांनी

अलवार ते सजते आहे

Wednesday, November 17, 2021

वणवा


 वास्तव किती ही होरपळून टाकणारं असलं तरी

त्याच्या प्रत्येक ठिणगी कडे सकारात्मकतेने पहावं.

भविष्यातील सूर्योदयाच द्वार

या वणव्यातूनच शोधावं

Tuesday, November 16, 2021

भान


 भविष्यात उजेड आणायचा असेल तर

अज्ञानाचा अंधार दूर व्हायला हवा.

वास्तवाचं भान ठेऊन

आयुष्यातील प्रत्येक क्षण जगायला हवा

Monday, November 15, 2021

हसू


 सोडून द्यायला शिकलं की

आहे या परिस्थितीतही

छान जगता येतं.

चेहऱ्यावरचं हसू मग

आपोआपच परत खुलून येतं

Sunday, November 14, 2021

प्रयत्न


 प्रयत्नांच्या पाऊलखुणांनी

अवघड वाटणारा रस्ता ही

खरंच सुखकर बनत जातो.

न सुटलेल्या गणिताचं कोडंही

अलगद सोडवून देतो

Saturday, November 13, 2021

वेळ


 चांगली वेळ येण्यासाठी

वेळेला सुद्धा वेळ द्यायला हवा.

चिरंतन अस्तित्व टिकवण्यासाठी

आपला सूर्य सुद्धा

तितक्याच ताकदीने उगवायला हवा


Friday, November 12, 2021

स्वर्ग


 स्वर्गीय वाटणारी प्रत्येक गोष्ट

स्वर्ग असतेच असं नाही

वास्तवातील पणती सगळ्यांनाच 

भावते असं नाही

सत्य आणि मिथ्या यातील फरक

 ओळखता यायला हवा

भावनांचा गुंता हळूवार पणे

आपला आपणच सोडवायला हवा

Thursday, November 11, 2021

आत्मसन्मान


 स्वार्थासाठी लाळ गाळून

नात्यांना सर्वश्रेष्ठ ठरवण्यापेक्षा

वाईटाचा निर्भयतेने प्रतिकार करून

आपल आस्तित्व निर्माण करावं.

त्यानंतरच आत्मसन्मानाने मिळवलेले यश

ताठ मानेन मिरवाव.

Wednesday, November 10, 2021

प्रश्न


 मनाच्या गाभाऱ्यात जेव्हा काही खदखदत

तेव्हा आपण फक्त शांत राहायचं.

मनातल्या मनालाच प्रश्न विचारून

त्याचं त्यालाच उत्तर शोधायला लावायचं


Tuesday, November 9, 2021

जगणं


 उद्याच्या सुंदर जगण्यासाठी

बळ भरावे पंखात

हसतमुखाने झेलत रहावा

होणारा प्रत्येक आघात


Monday, November 8, 2021

पायाभरणी


 उज्वल आयुष्यासाठी पायाभरणी

ज्याची त्यालाच करावी लागते.

अनुभवांची एक एक वीट रचून

तिला सकारात्मकतेच शिंपण करून

नवविचारांची पक्की इमारत बनवावी लागते.


Sunday, November 7, 2021

चांदणं


 चांदण्यात भिजण्यासाठी

चांदणं पसरण्याची वाट कशाला बघायची.

स्वतःच चांदणं बनून

अविवेकाची काजळी दूर सारायची अन्

मुक्त हस्ताने इतरांसाठी

 चांदण्याची बरसात करायची.

    

Saturday, November 6, 2021

सूर्य


 सूर्य पाळतो उशाशी

अन् वणवा साहतो आहे.

उजळण्या प्रकाशवाटा साऱ्या

आता स्वतः स जाळतो आहे.

Friday, November 5, 2021

भाऊबीज


 प्रेमाची भाऊबीज

घेऊन आली नवचैतन्याच्या ज्योती

भाऊरायाच्या दारी पडोत सदा

सुख समृद्धीच्या राशी.

आनंदाचा चांदोबा

तुझ्या गालात हसावा

माहेरचा उंबरा सदा

समाधानाने नटावा


Thursday, November 4, 2021

बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा


 चैतन्याने भरलेला दिवाळीचा पाडवा

दिवसेंदिवस वाढत जावो नात्यांमधील गोडवा.

ऋणानुबंधाची नाती अशीच दृढ व्हावी

नवी उमेद घेऊन प्रत्येक प्रभा  उगवावी

Wednesday, November 3, 2021

लक्ष्मीपूजन


 लक्ष्मीची पावले अंगणी सदा पडावी

सुख समृध्दी अन् समाधानाने

ओंजळ सदा भरावी.

सोबतीला सरस्वतीचा वरदहस्त लाभावा.

लक्ष्मी पूजनाच्या मंगलदिनी

घराघरातील लक्ष्मीचा सन्मान घडावा


Tuesday, November 2, 2021

दिवाळी


 संपू दे अंधार सारा

अन् नव तेजाने प्रत्येक दिशा उजळावी

सुख समृध्दी अन् समाधान घेऊन

प्रत्येक घरी दिवाळी यावी


Monday, November 1, 2021

धनत्रयोदशी


 धनाची सधनता अन् मनाची श्रीमंती

लक्ष्मीच्या पावलांनी सुख समृध्दी येवो दारी.

मना मनातील अंतराचा भेद मिटून जावा.

धनत्रयोदशीच्या दिवशी

ठेवा माणुसकीचा जपावा.


जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही