Monday, November 30, 2020

आयुष्य


 पदर खोचून सज्ज राहा

हसत हसत लढण्यासाठी सदा.

आयुष्य सुद्धा तुझ्यावर

होईल बघ फिदा.

         आराधना

Sunday, November 29, 2020

मशाल


हृदयात पेटणारी

धगधगती ती मशाल.

 गावी वेदनेच्या, सुखाने

नांदा तुम्ही खुशाल.

            आराधना

Saturday, November 28, 2020

नवा सूर्य


 तुझा नवा सूर्य अन्

तुझे नवे आभाळ.

तुझ्या नव्या आयुष्यात येवो

रोज नवी सकाळ.

              आराधना

Friday, November 27, 2020

तुळस


 सदा फुलू दे तुळस

देवा माझ्या अंगणात.

सुख समृध्दी, समाधानाची

नित्य व्हावी बरसात.

              आराधना

Thursday, November 26, 2020

नशीब


 बऱ्याच गोष्टी शिकायच्या राहून गेल्या.

काही वेचायच्या तर काही फुलायच्या राहून गेल्या.

आता वाटतंय वेचाव्या , शिकाव्या त्या गोष्टी.

पण नशिबाने आयुष्याच्या दोऱ्याच कापून नेल्या.

                    आराधना

Wednesday, November 25, 2020

मैत्री


 हक्काने काहीतरी मागावं

अन् मागितलेलं दान

अलगद झोळीत पडावं.

मैत्रीचं नातं

यापेक्षा वेगळं काय असावं

.       आराधना

श्वास


 श्वासा श्वासावर नाव

आनंदाचे कोरा.

तुमच्या माझ्या जगण्याचा

नित्य व्हावा नवा सोहळा.

               आराधना

Monday, November 23, 2020

संवाद


 नाकावर नसावा राग.

ओठांवर असावं हासू.

तेव्हा कुठं संवादाचे पक्षी.

आजुबाजुला लागतात बसू.

               आराधना

Sunday, November 22, 2020

चिमण्या


 चिवचिवणाऱ्या चिमण्या

अंगणात क्षणभरच खेळतात.

आल्या आल्या म्हणता म्हणता.

भुर्रकन उडून जातात.

                  आराधना

Saturday, November 21, 2020

आयुष्य


 चार दिवसाचं आयुष्य

छान हसत हसत जगायचं.

सुगंधी आठवणी मागे ठेवून

एक दिवस निघून जायचं7

Friday, November 20, 2020

मैत्री


 आयुष्यरुपी कुपीतील

सुगंधी अत्तर म्हणजे मैत्री.

डोळे झाकून विश्वास ठेवावा

असं हक्काच माहेर म्हणजे मैत्री.

धागा धागा विणत जातो.

संवादाच्या क्षणांनी

मैत्रीचा मार्ग फुलत जातो.

साथ देते ती मैत्री.

हात देते ती मैत्री.

आयुष्यभर मित्रासाठी जळत राहते.

अशी समई तील वात म्हणजे मैत्री.

म्हणूनच जपूया 

हा मैत्रीचा अनमोल ठेवा.

तेव्हा कुठं अनुभवता येईल

मैत्रीतील सुखद गारवा.

             आराधना

Thursday, November 19, 2020

मैत्री


 हवं तेव्हा हवं तितकं,

मनसोक्त बोलता यावं.

प्रत्येकाच्या आयुष्यात,

मैत्रीरुपी पान सतत,

हिरवाईने भरलेलं असावं.

       आराधना

Wednesday, November 18, 2020

पाऊल


 आज अडखळनारी पावलं तुझी

उद्या तुलाच साथ देतील.

रडशील ,पडशील ,धडपडशील तेव्हा

नव्यानं पुन्हा तीच तुला उभ करतील.

                     आराधना

Tuesday, November 17, 2020

प्रेम


 अंतरात रुजलेल्या प्रेमाला,

शेवटच्या श्वासापर्यंत जपायचं.

कुणी होवो न होवो आपलं,

आपण मात्र त्याचचं होऊन जगायचं.

                        आराधना

Monday, November 16, 2020

प्रारब्ध



 प्रारब्धाच्या पाऊलखुणा

अलगद पुसता येत नाहीत.

नशीब दगा देतं म्हणून,

नशिबावर रूसता येत नाही.

                  आराधना

Saturday, November 14, 2020

पणती


 नाही होता आलं

सूर्य तरी,

छोटी पणती बनावं.

मिणमिणत्या प्रकाशात तिच्या,

सारं जग उजळून निघावं.

                 आराधना


Friday, November 13, 2020

लक्ष्मी पूजन


लक्ष्मीच्या पावलांनी

सुख यावे दारी

सुख संपत्ती, समाधान,आरोग्य

नांदू  दे अखंड तुमच्या घरी.

                    आराधना

Thursday, November 12, 2020

धनत्रयोदशी


 इथं धनाचा लोभ कुणाला

प्रेमाची नाती जपायची.

धनत्रयोदशीच्या निमित्ताने

 माणूस रुपी पूंजी पूजायची.

            आराधना

Wednesday, November 11, 2020

वसुबारस.


 अंतरात खोल खोल

एक दीप उजाळावा.

चैतन्याने त्याच्या

नवविचारांचा  उदय व्हावा

              आराधना

Tuesday, November 10, 2020

बंध


 तुटायचे ते बंध रेशमी

तुटूनीया गेले.

डोळ्यांमधले हसरे मोती

गळूनीया गेले.

         आराधना

Monday, November 9, 2020

पाऊल


 रात्र अंधारी आहे.

सावध होऊन पाऊल टाक.

दूर क्षितिजाच्या पलिकडे तेव्हाच

तुझी ऐकू जाईल हाक.

           आराधना

काळोख


 गर्द भयाण काळोखाला

कापीत तुजला जायचे आहे.

आयुष्याच्या या पाटीवर

चित्र सुरेख रेखायचे आहे.

            आराधना गुरव

Sunday, November 8, 2020

मायाजाळ


 कोण जाणे आयुष्याची

कधी होईल संध्याकाळ.

व्यर्थ कशाला गुंफायचे मग

वेदनांचे मायाजाळ.

    आराधना गुरव


Saturday, November 7, 2020

चिता

 मरण पाठीशी बांधून फिरतो

भिती कशाची वाटतं नाही

धगधगत्या चितेची ज्वाला

नव्याने जगण्याचे बळ देई

                  आराधना गुरव


Friday, November 6, 2020

मौन


 कधी कधी स्वतः च

मौन धारण करावं.

आत्मटीकेच्या हातोडीन

स्वतः लाच फोडून घ्यावं.

                 आराधना गुरव



Thursday, November 5, 2020

आभास


 आभासी दुनियेतील

धुकं दूर झालं की

वास्तवाचा लख्ख प्रकाश

आपोआप समोर येतो.

                       आराधना गुरव

Wednesday, November 4, 2020

मन


मन जेव्हा शांत राहा

म्हणत ना ,

तेव्हा त्याला

शांत राहू द्यावं.

त्याचं त्यालाच

आतल्याआत

अलगदपणे उमलू द्यावं.

                आराधना गुरव

Tuesday, November 3, 2020

विश्वास


 विश्वास ठेव पंखावर

अन् सामर्थ्य भर मुठीत.

एवढं मोठं आभाळ ही

मग मावेल तुझ्या मिठीत.

              आराधना गुरव

          

Monday, November 2, 2020

मन


सोबत असण्याने किंवा नसण्याने,

फरक कधीच पडत नसतो.

मनं एक झाली की मग,

सगळा भेद आपोआप

गळून पडत असतो.

             आराधना गुरव

Sunday, November 1, 2020

सहवास


सहवासाच्या सुगंधी फुलांनी,

आयुष्य आपलं सजवायच.

हसत, खेळत आयुष्यात,

आनंद वाटत राहायचं.

                    आराधना गुरव

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही