Friday, December 31, 2021

नूतनवर्षाभिनंदन


 नव्या वर्षातील रंग नवे

नव्या आकांक्षा अन् स्वप्न नवे.

नव्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी

मनात लढण्याचे बळ हवे.

सामर्थ्याने पंख पसरून

उंच आकाशी झेप घ्यावी

नव्या पर्वाचा स्वागताला

प्रत्येक उषा सज्ज व्हावी

Thursday, December 30, 2021

आयुष्य


आयुष्यातील एक एक पान

हळूहळू पलटत राहत.

मनाच्या आभाळात मात्र

अखंड आठवणींच येणं जाणं सुरू राहत.


Wednesday, December 29, 2021

धागा


 कधी कधी नकारात्मकतेच्या धाग्यातही

खूप सकारात्मकता दडलेली असते.

बघणारा त्या प्रत्येक गोष्टीकडे कसा बघतो

यावरच तर  भविष्याची पायवाट ठरत असते.

    


Tuesday, December 28, 2021

ओंजळ


 आयुष्य जेव्हा हलकेच

ओंजळीत विसावू पहात

तेव्हा त्याला खरंच विसावू द्यावं.

त्याला नक्की काय हवं आहे हे

त्याचं त्यालाच शोधू द्यावं


Monday, December 27, 2021

शेवट


 एखाद्या गोष्टीचा झालेला शेवट ही

कधी कधी नवीन चांगल्या गोष्टीची सुरवात ठरते.

नव नव्या वाटा चोखंदळपणे हाताळण्याची

जणू आयुष्यचं तुम्हाला संधी देते

Sunday, December 26, 2021

कवडसा


 अंधारल्या भूमीतही

एक कवडसा हळूच हसतो.

अंधाराला गिळून अवघ्या

सामर्थ्याची ज्योत पेटवतो

    

Saturday, December 25, 2021

मन


 घोंघावणार वारं सुद्धा

माझ्या जवळ आलं की शांत उभ राहत.

माझ्या सारखच त्यालाही जणू

माझं भिरभिरनार मन कळत.

Friday, December 24, 2021

गुलमोहर


 चारी बाजूंनी वैशाख असला तरी

गुलमोहरासारख मनसोक्त बहराव

 सकारात्मकतेच्या एका विचाराने

अवघ्या आयुष्याच सोनं व्हाव.


Thursday, December 23, 2021

वाट


 खुंटलेल्या वाटा अन् विझलेले आधराचे दिवे

 खरच खूप काही सांगून जातात.

तुझी पायवाट तूच उजळवण्यासाठीच जणू

त्या वाटा स्वतः ला गोठवून घेतात.


Wednesday, December 22, 2021

पावलं


 पावलांनाही मी आता बजावलय

थकून चालायचं नाही

मनात कोरलेल स्वप्न सत्यात उतरवल्याशिवाय

मागे फिरायच नाही

Tuesday, December 21, 2021

तुषार


 पेरीत जावे रोज नव्याने

आनंदाचे तुषार

तेव्हा कुठे थांबवता येतो

आयुष्याचा होणारा बाजार

Monday, December 20, 2021

कवडसा


 कुठून तरी एखादा 

हलकासा कवडसा येतो.

अन् युगायुगांचा अंधार

 क्षणात नाहीसा होतो.

Sunday, December 19, 2021

सकाळ


 रोजची नवी सकाळ

नवा सुगंध उधळीत येते.

 थांबायचं नाही तुला

 पुढे चालायचं आहे 

जणू हेच सांगून जाते

Saturday, December 18, 2021

स्वप्न


 दिवस येतात तसे जातात

प्रत्येक दिवसाची नवी

सुरवात करून देतात.

प्रत्येक दिवसाकडे असच सकारात्मकतेने पहायचं

भविष्याच सोनेरी स्वप्न अखंड

 मनातफुलवत राहायचं

Friday, December 17, 2021

इतिहास


 काही गोष्टी अशा असतात

ज्या खरंच तुमचं अख्खं 

जग व्यापून टाकतात.

ध्येयापर्यंत जाण्याची प्रेरणा देऊन

तुमच्या ही नकळत तुमचा नवा इतिहास

लिहीत राहतात

Thursday, December 16, 2021

शिडी


दुसऱ्याची शिडी घेऊन यशाची शिखरं

 चढणाऱ्या पावलांपेक्षा

स्वतः चा मार्ग स्वतः च शोधत रहायचा असतो

त्यानंतर मिळालेल्या यशाचा सुगंध मात्र

आपोआप चोहीकडे पसरतो


Wednesday, December 15, 2021

बियाण


 आयुष्यात उजेड यायचा असेल तर

आधी उजेडाच बियाण पेरावं लागतं.

 उगवत्या सूर्याच तेज

तेव्हाच तुमच्या मुखावर चमकत


Tuesday, December 14, 2021

ध्येय


 ध्येय जितकं सुंदर असेल

तितकाच सुंदर त्या ध्येयापर्यंतचा प्रवास ही असावा.

त्या वाटेवरील प्रत्येक क्षण

इतरांसाठी प्रेरणादायी ठरावा

Monday, December 13, 2021

रंगमंच


 आयुष्याच्या रंगमंचावरचा

प्रत्येक रंग वेगळा असतो.

आपण फक्त प्रत्येक रंगात 

छान रंगून जायचं.

रंगपंचमीच्या दिवसाचा आनंद

प्रत्येक क्षणी घेत राहायचं


Sunday, December 12, 2021

पाझर


 शब्दांना नुसता बहर येऊन चालत नाही

तिथे भावनांचा ओलावा ही जाणवावा

कळायचं म्हणल तर नुसत्या विचाराने ही

डोळ्यांना पाझर फुटावा

Saturday, December 11, 2021

नवी आशा


 जगणे उन्हाळताना

बंद झाल्या जरी दाही दिशा

आपली आपणच फुलवत राहायची

नवी स्वप्ने अन् नवी आशा.


Friday, December 10, 2021

वेळ


 वेळ कुठे थांबते कुणासाठी

आपणही तिच्या प्रवाहाबरोबर

पुढे चालत राहायचं.

मनातलं ध्येय पूर्ण होईपर्यंत

आपल काम प्रामाणिकपणे करत राहायचं

Thursday, December 9, 2021

शिवप्रताप दिन


 शिवरायांच्या दृढ निश्चयाची

साक्ष सह्याद्री देत असे.

प्रतापगडाचा पायथा ही मग

अभिमानाने फुलून येत असे.

तलवारीच्या पात्यास बघून

शत्रू थरथर कापीत असे.

शिवरायांचे मावळे आम्ही

अन्याया विरुद्ध लढता लढता

पंचप्राण देऊ आमचे

Wednesday, December 8, 2021

शब्द


 शब्द जिंकायला हवा.

शब्द पेलायला हवा.

शब्द सारी गुतांगुत

शब्द मनीचे हितगुज

शब्द मनात राहण्या

शब्द सावराया हवा.

Tuesday, December 7, 2021

गाणे


 आयुष्य हे सुख दुःखाचे गाणे व्हावे.

रात्रीच्या गर्भात जणू चांदणे फुलावे.

पडता पडता, रडता रडता

प्रत्येक थेंबाचे जणू फूल बनावे.

Monday, December 6, 2021

दाद


 वेदनांच्या गाण्यातून ही

सुखाची मस्त तान मारता आली पाहिजे.

क्षण कसा का असेना

आयुष्यातील प्रत्येक क्षणाला

मनमुराद दाद देता आली पाहिजे

Sunday, December 5, 2021

शब्द


 शब्द कसा का असेना

त्या प्रत्येक शब्दाचा सन्मान व्हावा.

ओठी उमटणाऱ्या प्रत्येक शब्दातून

सरस्वतीचा हुंकार ऐकू यावा

Saturday, December 4, 2021

वसंत


 मनातील वसंताला

तुलाच आता सतत बजावत राहायचं आहे.

किती ही होऊ दे पानगळ

तुला पुन्हा नव्याने बहरायच आहे.

Friday, December 3, 2021

संघर्ष


 संघर्ष दुसऱ्याशी करण्यापेक्षा

जेव्हा आपल्याच मनाचा आपल्या

 मनाशी संघर्ष घडतो

आपल्या प्रगतीचा मार्ग मग

आपला आपल्यालाच गवसतो

Thursday, December 2, 2021

आव्हान


 घाव मिळतात ही अन् घाव भरतातही

काही ना काही पाऊलखुणा मागे उरतात  तरी ही 

त्या प्रत्येक पाऊलखुणापासून काहीतरी सकारात्मक शिकायचं.

आयुष्यातील प्रत्येक आव्हान हिमतीनं पेलायचं

Wednesday, December 1, 2021

घाव


 काही घाव असे असतात की जे

खरंच तुम्हाला सुंदर बनवतात.

कुरूप तेच्या साऱ्या बेड्या तोडून

तुम्हालाच अद्वितीय बनवून टाकतात

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही