वेळ आली तर चंद्र ताऱ्यांशी सुद्धा
भांडता आलं पाहिजे.
इतकं सामर्थ्य आपल्यात निर्माण करावं की
स्वतःच्या नजरेत स्वतः लाच ताठ मानेनं
उभा राहता आलं पाहिजे
भांडता आलं पाहिजे.
इतकं सामर्थ्य आपल्यात निर्माण करावं की
स्वतःच्या नजरेत स्वतः लाच ताठ मानेनं
उभा राहता आलं पाहिजे
मनात सकारात्मकतेच एक वलय तयार होत.
त्या प्रत्येक वलयातून मग
यशाचं सुंदर चित्र आपोआपच रेखल जातं
मराठी आमच्या घराघरात फुलू दे
येऊ दे मराठीचा वसंत नित्य भेटायला
गोडी ही अमृताची
युगानुयुगे मिळो चाखायला.
तुम्हाला विवेकाच्या उंचीवर घेऊन जातं.
सुख आणि समाधान यातील फरक
अगदी सहजपणे समजून देतं
प्रगल्भ होत जातात.
प्रत्येक कृतीपूर्वी विचार करण्याची
एक वेगळीच शिकवण देऊन जातात.
त्याला दुष्काळात सुद्धा उगवता येतं.
कुस्करले ज्या हातांनी फुलांना
त्या हातांना ही सुगंधित करता येतं.
स्वतः च सावली बनायचं.
उन्हात चालणाऱ्या प्रत्येकालाच मग
आपली शितल छाया देत राहायचं.
अचानक एक सूर्य उगवला.
संघटन करून मावळ्यांचे
स्वराज्यस्थापनेचा विडा उचलला.
राज्य उभारले समतेचे अन्
प्रत्येकाच्या मनात भगवा फडकला.
इतिहास सदैव साक्ष देईल.
तुमच्या पराक्रमाची गाथा
अनादी अनंतापर्यंत
मनाचा ठाव घेतच राहील.
शिवछत्रपती होणे न दुसरा
महाराज तुम्हाला मानाचा मुजरा.
काळ जेव्हा हसत असतो
तेव्हा समजायचं गमावलं
त्यापेक्षा अधिक चांगलं
काही तरी नक्कीच
मिळणार आहे.
मोर पुन्हा नव्याने
तुझ्या अंगणात नाचणार आहे.
शांत राहून वाट चालत राहायचं.
तुला अजुन गड जिंकायचा आहे
हेच मनाला अखंड बजावत राहायचं.
अखंड गुंफलेला असावा.
आपुलकीच्या ओलाव्याने
प्रत्येकाच्या मनात
माणुसकीचा भाव जागा व्हावा.
दुःखाच ही हसत हसत चुंबन घेता यावं.
ओंजळीत येणारं दान कसं का असेना
त्याला नेहमी सकारात्मकतेच्या
दागिन्यांनी सजवता यावं.
विझतील दिवे
आधाराचे ही निखळ तील दुवे.
वाट मात्र तुझी तुलाच आता चालायला हवी.
यशाची मालिका अखंड चालू ठेवायला हवी
अदृश्यपणे सतत आशिर्वाद देत राहते.
तुमच्या आयुष्यात म्हणूनच कदाचित
यशाच्या सोनेरी किरणांची
अखंड बरसात सुरू होते.
हुकलं त्याला हसून टाळून पुढे जायचं.
प्रत्येक डाव नव्याने मांडत राहायचं.
आयुष्यातील प्रत्येक क्षण असच
नित नव्या उमेदीने जगत राहायचं
जखमा देतात तेव्हा खरचं
आत्मटीकेच्या छन्नीने
स्वतः लाच खोलवर खणत जावं
अन् आपल्याला पडलेल्या प्रश्नांचं उत्तर
जरा आपणच शोधून पाहावं
मखमली पायघड्या.
जरा काट्यांवरून ही चालून बघ
तिथे ही दिसतील तुला
यशापर्यंत घेऊन जाणाऱ्या
लांबच लांब शिड्या
आज सारेच एकटे पडले
गहिवरल्या डोळ्यातील
अश्रूही वहात सुटले.
प्रत्येक सूर जणू
आज मुका झाला.
हृदयात आपसूक
हुंदका दाटून आला.
वेड लावले जगास साऱ्या
ते सूर आज का थांबले?
स्वर कोकिळेचे विधात्या
का हिसकावूनी घेतले?
तार तुटली सतारीची
अन् संगीत पोरके झाले.
सप्त स्वरांनी तुम्हाला
अमरत्व बहाल केले.
संगीत साधना संपली तरी
सूर निनादत राहतील.
आम्हां भारतीयांची मने तुम्हाला
सदैव गुणगुणत राहतील.
घडावा चमत्कार पुन्हा
अन् शारदा पुन्हा जन्माला यावी
गान कोकिळा पुन्हा नव्याने
भारत भूवरी अवतरावी
सौ आराधना गुरव
अन् क्षणात ऋतुही
पालटून जावा.
नव्या क्षणांच्या स्वागतासाठी मग
प्रत्येक श्वास घेत राहावा
मन कोणत्याच मोहाला बळी पडत नाही
आणि असं अढळ मन जिथे असेल तिथे
यशही आपल्या पाऊलखुणा
उमटवल्या शिवाय रहात नाही.
पावलं आपोआपच पुढे पुढे पडतात.
येणारा प्रत्येक अडथळा पार करत
मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतात.
खळखळून हसता यायला हवं.
आयुष्यातील प्रत्येक क्षणाकडे
सकारात्मकतेने बघता यायला हवं