विचार आणि कृतीत
खरचं खुप कमी अंतर असावं
मनात आलेल्या विचारांचं प्रतिबिंब
आपल्या प्रत्येक कृतीतून दिसावं
खरचं खुप कमी अंतर असावं
मनात आलेल्या विचारांचं प्रतिबिंब
आपल्या प्रत्येक कृतीतून दिसावं
वरून मात्र शांतच दिसावं.
संथ वाहणाऱ्या नदीप्रमाणे
येईल ते कवेत घेत
पुढं जात राहावं
मनात मात्र नेहमी सूर्य पाळून जगावं.
आशेच्या असंख्य दिव्यांनी मग
आपलं आयुष्य आपणच उजळवावं
गालावर फुललेलं एक हास्य
खूप काही सांगून जातं.
संकटातही जिद्दीने लढण्याचं
जणू सामर्थ्य देऊन जातं.
भिकारी होऊन राहावं
मिळतील ते दोन घास
स्वतः च्या जिद्दीने अन् कष्टाने कमवून खावं.
स्वतःच्या अस्तित्वाची किंमत कळत नाही.
आणि अस्तित्वाची किंमत कळल्याशिवाय
हातून इतिहास घडत नाही.
आशेची सोनेरी किरणे चमकतात.
यशाच्या पाऊलखुणांनी मग
आयुष्याच्या रांगोळीत मनसोक्त रंग भरतात.
जाणीव होते स्वत्वाची.
त्यानंतर मात्र लढाई चालू होते
जगाच्या या बाजारात
स्वतः च अस्तित्व टिकवण्याची
वाट हरवायला होतच.
पण हरवलेली वाट वेळीच शोधून काढायची.
त्याच वाटेवरून आपली पावलं रेखीत जायची
तेव्हा त्याला मनसोक्त बरसून द्यायचं.
आभाळ बरसून गेल्यानंतरच नवचैतन्य मग
आपलं आपणच अनुभवायचं
अवघड असतं ते शिकणं.
आणि त्याहून ही अवघड असतं
शिकलेल्या वाटेवरून जबाबदारीने पावलं टाकणं.
उन्हाचा चटका कधीच जाणवत नाही.
आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने निघालेल्या पावलांना
वाटेतील अडचणींचा डोंगरही
कधीच मोठा वाटतं नाही.
गौराई जाईल माघारी.
दोन दिसाची पाहुणी
आठवेल रात दिनी
एका वर्षांन पुन्हा
गाठभेट आपली ग.
सुखाच दान तुझ्याही
सदा पडो पदरात ग.
जप संसार वेलीला
वाढव कुळाचा अभिमान
एका वर्षान मला
पुन्हा भेटायला ये ग
सोन्याच्या पावलांनी.
सुख समाधान नांदू दे
माझ्या ग अंगणी.
नको हिरे ग नको माणिक
अखंड सौभाग्याच दान
टाक पदरात.
मनीची कामना पुरी होऊ दे.
समाधानाच्या मोत्यांनी
ओंजळ भरु दे.
सुंदर नसला तरी चालेल
पण तो योग्य असावा.
अशा रस्त्याने चाललेल्या प्रत्येक क्षणाचा
एक नवा इतिहास घडावा.
हे गणराया तू सामर्थ्य दाता.
तुझ्या चरणी अखंड नतमस्तक मी
तूच सकल जगाचा त्राता.
निती, न्याय अन् सन्मार्गाने चालण्याचे
सामर्थ्य फक्त दे आता.
मनानं मात्र कधी थकू नये
आभाळ येतच एक ना एक दिवस मुठीत
पण त्यासाठीचे प्रयत्न मात्र अर्धवट सोडू नयेत.
तितक्याच विश्वासाने पुन्हा उडता यावं.
माणसामाणसातील विश्वासाचं नातं ही
इतक्याच विश्वासाने आयुष्यभर जपता यावं
ज्ञान देतो,गु
देतो आत्मबळ अन् सन्मान.
वाट दाखवतो आम्हा
नितीने जगणे शिकवतो आम्हा.
सदा जागे करतो आत्मभान.
जगी असा गुरु लाभणे
हाच असे मोठा बहुमान.