नाही जगता येत मनासारखं कधी कधी
म्हणून जगणं सोडायचं नसतं.
निसटून गेलेलं पकडण्याच्या नादात
हातात असलेलं गमवायच नसतं.
आराधना
नाही जगता येत मनासारखं कधी कधी
म्हणून जगणं सोडायचं नसतं.
निसटून गेलेलं पकडण्याच्या नादात
हातात असलेलं गमवायच नसतं.
आराधना
थोडंसं बाहेर येऊन पाहिलं की
जगाची नव्याने ओळख होते
आणि जग अधिकच सुंदर वाटू लागत.
पंखात बळ भरायलाच हवं.
यशाचं शिखर गाठायचं असेल तर
वाटेतील काट्यांना ही फुलं समजून
अलगद दूर सारायला हवं.
म्हणून चालणं सोडायचं नसतं.
वाटेत येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला
जिद्दीने तोंड द्यायचं असतं.
पण आपणच शिकत नाही.
नंतर मात्र यातून सावरण्यासाठी
अख्खं आयुष्यही पुरत नाही.
आराधना
एका अक्षराचा आहे.
ते अक्षर जोडलं की सारी नाती तुटून जातात
आणि ते अक्षर काढून टाकलं की
नवी नाती निर्माण होतात.
काय करायचं आणि कस वागायचं
जोडायच की तोडायच
ज्याचं त्यानेच ठरवायचं.
प्रयत्नांची पावले योग्य दिशेने टाकावी.
तेव्हा कुठे होते
आयुष्यभर पुरणारी समाधानाची कमाई.
अर्नदिप
कधी दुसऱ्याला देण्यात तर कधी दुसऱ्याच ओरबाडून घेण्यात ती लपलेली दिसते.
देण्यात जे समाधान आहे ते ओरबाडून घेण्यात नाही.
म्हणूनच आजही अमर आहे संतांची अभंगवाणी
अर्नदिप
हे ज्याचं त्यालाच कळाव.
ज्याचं त्याचं आयुष्य
ज्याला त्यालाच सावरता यावं
अर्नदिप
पण तेव्हा आपली दारे बंद असतात.
आणि आपण जेव्हा दारे उघडतो
तेव्हा नशिबाचे फासे उलटे पडलेले असतात.
अर्नदीप
आता रोजच दारात होते.
माझ्या प्रामाणिक आणि अथक प्रयत्नांची
जणू पोहोच पावती देते.
अर्नदिप
मार्ग आपोआप तयार होतो.
अनंत अडचणींचा डोंगर तेव्हा
इवल्याशा टेकडी एवढा वाटतो.
अर्नदिप
लिहिताच नाही आल्या.
शब्द ही झाले कातर
अन् पापण्या ओल्या झाल्या.
बाग गेला सुकून
आता बहर मागवा कोणाकडे
बहरण्यासाठी अमृत देणारा
झरा च आटून गेला.
पुन्हा नव्याने फुटो पालवी
अन् बहर पुन्हा तो येवो.
विचार सुमनानी तुमच्या
आमचा कणकण गंधित होवो.
अर्नदिप
आतून अन् बाहेरूनही.
ऐरणी सारखं कणखर बनायचं.
येणाऱ्या प्रत्येक आघाता ला
तितक्याच ताकदीने सामोरं जायचं.
अर्नदिप
आपण फक्त त्याचं सोनं करायचं.
अस्सल खणखणीत नाण्यासारख
कुठंही पडलं तरी वाजत राहायचं.
अर्नदिप
त्या कधी कापून टाकायच्या नसतात.
मायेची आणि आपुलकीची फुंकर घालून
त्या अलगदपणे पुन्हा विणायच्या असतात.
अर्नदिप