जेव्हा शब्द मुके होतात तेव्हा
मौनाच्या गाभाऱ्यात बंदिस्त व्हावं
आपणच आपल्याला नव्याने सापडेपर्यंत
मनाशीच आपल्या रोज नव्याने बोलत राहावं
जेव्हा शब्द मुके होतात तेव्हा
मौनाच्या गाभाऱ्यात बंदिस्त व्हावं
आपणच आपल्याला नव्याने सापडेपर्यंत
मनाशीच आपल्या रोज नव्याने बोलत राहावं
अन् क्षणात शांत ही होऊन जातो.
निश्चल खडकासारख आपण
अढळ उभं राहायचं.
त्याचं त्यालाच मनानं
परतून जायला भाग पाडायचं
काहीतरी सुचवत असतो.
होणाऱ्या नव्या बदलांना
सकारात्मकतेने सामोरे जा
जणू हेच तो सांगत राहतो
तसचं दुःखाच्या क्षणीही फुलता यावं
प्रत्येक दुःखाचं एक फूल बनवून
आनंदाने केसात माळता यावं.
काळाच्या पानावर कोरल जातं
मनात पाहिलेलं प्रत्येक स्वप्न
तेव्हाच सत्यात उतरलं जातं
पानगळीची हळूच चाहूल देऊन जातो.
पुन्हा नव्याने ऋतु बहरण्याची
वाट पहात राहायची.
नव्या स्वप्नांच्या सोबतीने
पुन्हा आपली वाट चालतं राहायची
पण आपण मात्र अस्सल बियानासारखं
उशीरा पण परिपक्वता घेऊनच उगवावं
एका एका कणांनही मग
अस्सलतेचं गाणं गावं
ऊन
आजूबाजूचं प्रत्येक ऊन
अलगदपणे झेलता यावं.
कधी आलीच सावली मदतीला तर
तिला ही लडिवाळपणे पेलता यावं.
फार काही करता आलं नाही तरी
आयुष्याचं रितं झालेलं माप
आपलं आपल्यालाच भरता यावं
मोडलेला डाव नव्याने मांडायचा.
उगवत्या सूर्याच्या साक्षीने
आयुष्यातील प्रत्येक रंग
खुलवत राहायचा
बोलका अंधार ही
खूप काही सांगून जातो.
त्या अंधारातच आपल्या मनाचं नातं
आपल्याशी जोडून देतो.
फक्त प्रामाणिकपणे
कष्ट करण्याची जिद्द हवी.
प्रत्येक क्षणाला फुटू लागते
आशेची मग नवी पालवी
असंख्य फुगवतटे तयार होतात
अन् क्षणात नाहीसे होतात
संथ लयीत वाहणारे पाण्याचे थेंब
म्हणूनच तर कायम आपलं अस्तित्व
जपत राहतात.
म्हणूनच वेगानं येणारी लाट बनण्यापेक्षा
छोटासा थेंब बनून राहायचं
आयुष्याच्या समुद्रात
आपलं अस्तित्व कायम स्वरुपी सिद्ध करायचं
हल्ली मी पावसाच्या
प्रत्येक सरीत भिजून घेते.
मनातल्या प्रत्येक व्यथेला
त्याच्या स्वाधीन करून
मी मात्र मोरासारखं
मनसोक्त पावसात नाचून घेते.
प्रारब्धातल्या रेषा सुद्धा बदलता येतात.
क्षितिजापलिकडच्या गोष्टी ही
अलगद नजरेच्या टप्प्यात येतात
वाटेवरच्या सावल्याही साथ देतात.
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यथेला
कथेत बदलून टाकतात
तुझ्यासाठीच असायला हवं
सारं आकाश कवेत घेण्यासाठी
तुझं तुलाच पाऊल उचलायला हवं
झुगारून टाक सारी बंधनं
अन् साऱ्या शृंखला ही तोड
तुझं नातं तुझ्याशीच
नव्याने तू जोड
उजेडाच्या वर्तुळा पलीकडेही
दाट काळोख दडलेला असतो.
आपल्या बऱ्या वाईट कर्माचा हिशोब
तिथेच तर लिहिलेला असतो.
जेव्हा विझून जातात
तेव्हा आपल्या मनात मात्र विचारांची
बारीकशी ज्योत प्रज्वलित करायची
तिच्या हलक्या प्रकाशातच मग
आपली वाट आपणच शोधत राहायची