Sunday, July 31, 2022

गाणं


 फुलांच वेड असावच

पण  काट्यांतील साैंदर्य ही

पाहता यावं.

त्यांना ही अलगद शब्दांत गुंफून

त्याचं सुरेल गाणं बनवता यावं.

Saturday, July 30, 2022

खोली


 मनाची खोली आवरायला गेलं की

जरा जास्तच पसारा होतो.

मोकळ्या आभाळातून ही मग

अचानक पाऊस बरसू लागतो.

Friday, July 29, 2022

आयुष्य


 वेळेनुसार बदलायला शिकायला हवं

आयुष्याच्या रंगरूपानुसार

त्या त्या बदलात स्वतःला 

रंगवता यायला हवं.

थांबत नसतचं मुळी आयुष्य

म्हणून पुढे चालायला शिकायला हवं.


Thursday, July 28, 2022

दिवा


 स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करताना

स्वतःच दिवा बनावं .

काजव्याप्रमाणे स्वयंप्रकाशित होऊन

आपली वाट आपणच शोधत राहावं


Wednesday, July 27, 2022

पाऊस


 हल्ली माझ्या दारात

रोजच पाऊस पडतो.

म्हणूनच की काय

पावसाच्या प्रत्येक सरीतून

अनुभवलेला प्रत्येक क्षण 

नव्याने कळतो.


Tuesday, July 26, 2022

जाणीव


 स्वत्वाची जाणीव झाली की

अस्तित्व जपण्यासाठी प्रयत्न केले जातात.

हेच प्रयत्न तुम्हाला मग

तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जातात.

Monday, July 25, 2022

आयुष्य


 आयुष्य जितकं जास्त भिजतं

तितकच जास्त ते रुजतं.

भिजलेल्या आयुष्यातूनच

म्हणून तर नित नवं गाणं फुलतं

Sunday, July 24, 2022

पूर


 पूर आला

ओसरून गेला.

जाता जाता

नवचैतन्याचं 

लेण देऊन गेला.

Saturday, July 23, 2022

स्वप्न

  नव्या स्वप्नांच्या ध्यासाने

पावलं वेगाने पडायला लागतात.

वाटेवरच्या अडचणी ही मग

फुलांप्रमाणे भासायला लागतात


Friday, July 22, 2022

सुख


 ओंजळीतील सुखाला अन्

पचवलेल्या दुःखाला

कधीच नसतं विसरायचं 

दोघांच्याही जोडीने

आयुष्य असतं फुलवायचं


Thursday, July 21, 2022

पाऊस


 मनात साचलेला पाऊस

कधीतरी बरसतो.

म्हणूनच तर त्या पावसानंतर मग

समोरचा रस्ता चकचकीत दिसतो

Wednesday, July 20, 2022

जीवन


 जीवन जगण्याची कला जमली की

अवघड गोष्टी ही सोप्या होऊन जातात.

समोर उभा राहिलेली आव्हानंही मग

हवेतल्या बुडबुड्यासारखी क्षणार्धात

 विरून जातात.

Tuesday, July 19, 2022

कोश


 हवीहवीशी किरण जेव्हा नकोशी वाटतात

तेव्हा स्वतःला बंद करून घ्यावं कोशात.

आपण नक्की कोण? याचं उत्तर मग

फुलपाखरू बनल्यावर

 सापडत आपल्याच अंतर्मनात.

Monday, July 18, 2022

इतिहास


 तेजाने पुन्हा उजळण्यासाठी

एक दिवा आत पेटावा.

त्याच्या ज्योतीने मग प्रत्येक क्षणी

एक नवा इतिहास लिहावा.


Sunday, July 17, 2022

वाट


 काळोखाच्या वाटेवरुनही

पाय घट्ट रोवून पुढे चालत राहायचं.

आपल्या स्वप्न पूर्तीसाठी

स्वतःच दिवा बनुन

अखंड तेवत राहायचं

Saturday, July 16, 2022

पाऊस


 पावसाची प्रत्येक सर

आता आनंद देण्यासाठीच येते

मनामनाचं ओझं

क्षणात हलकं करून जाते

Friday, July 15, 2022

इतिहास


 सन्मानाला जखम झाली की

त्याची वेदना काळजापर्यंत पोहोचते.

त्या क्षणी तुमच्या मनात

इतिहास घडवण्याची ठिणगी पेटते

Thursday, July 14, 2022

मावळती


 अंधाराच्या कुशीतही

उद्याचा सूर्य लपलेला असतो.

नव्याने पुन्हा उगवण्यासाठीच तो

आनंदाने मावळत राहतो


Wednesday, July 13, 2022

आभाळ


 आभाळ येतं भरून

बरसून मोकळं होण्यासाठी.

म्हणूनच कदाचित

बरसून गेल्यानंतरच

नव चैतन्याने फुलून येते धरणी


Tuesday, July 12, 2022

स्वप्न


 काळोख असता उशाला

मनात स्वप्न सूर्योदयाचे पेरावे.

जीव लावावा स्वप्नांना असा की

स्वप्न लेकरू बनुन मांडीवर खेळावे

Monday, July 11, 2022

बैलपोळा


सर्जा राजाची जोडी

असे श्रमाचे प्रतीक.

त्याच्या साथीने रेखावे

शिवारी हिरवे स्वस्तिक

Sunday, July 10, 2022

नवसंजीवनी


 स्वतःच स्वतःला कधीतरी

आतवर खोल खोल शोधत राहावं.

नवसंजीवनी घेऊन

पुन्हा नव्याने बहरत राहावं

Saturday, July 9, 2022

आषाढी एकादशी


 विठ् नामाचा लागे ध्यास

देह वारकरी होतो.

मुखातून अभंगवाणी

मन गाई हरिपाठ.

जिथे खूण माणसाची

तिथेच पडे विठ्ठलाशी गाठ

इंद्रायणीचा गाभारा

भरे काठोकाठ



Friday, July 8, 2022

पाऊस


 रिमझिमनारा पाऊस हल्ली

आनंदाच्या असंख्य लहरी घेऊन येतो.

अन् वेदनांच्या जाणिवांना

क्षणात दूर लोटून देतो

Thursday, July 7, 2022

प्रगती


 आपणच आपल्याला

 कुरवाळत बसलं की

तळ्यातल्या तळ्यातच

समुद्र वाटायला लागतो.

याने फार नुकसान नाही झाले तरी

प्रगतीचा मार्ग मात्र खुंटून जातो.


Wednesday, July 6, 2022

विसावा


 पळून पळून मन थकत 

म्हणून त्यालाही कधीतरी 

थोडा विसावा द्यावा.

विसवण्यात ही किती समाधान असतं

याचा अनुभव आपला

 आपल्यालाच घेता यायला हवा.

Tuesday, July 5, 2022

स्वप्न


 आपल्या पद्धतीने आपण

नियतीशी दोन हात करत राहायचं.

आपला स्वाभिमान गहाण न टाकता

मनात परलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं.


Monday, July 4, 2022

इतिहास


 ऋतु कोणताही असो

हसतमुखाने सहन करायचा.

त्याच्या प्रत्येक क्षणातून

यशस्वी संघर्षाचा

नवा इतिहास रचायचा

Sunday, July 3, 2022

शिखर


 आयुष्यात येणारं प्रत्येक माणूस

सतत नव्याने वाचता यायला हवं

त्याच्याबरोबरचा क्षण कसा का असेना

त्याला सकारात्मकतेच लेबल लावून

आपल्या प्रगतीचा आलेख

उंचावत ठेवत 

यशाचं शिखर गाठता यायला हवं

Saturday, July 2, 2022

उगवती


 आता प्रत्येक उगवती

नवी आशा घेऊन येते.

अन् उद्याच्या सुंदर जगण्याची

नवी वाट दाखवून जाते.

Friday, July 1, 2022

गाणं


 अंधाराशी ही हसत हसत

मैत्री करता आली की

आयुष्य सुकर होऊन जातं.

प्रत्येक क्षणाच मग आपोआपच

सुरेल गाणं बनतं.


जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही