निसटून गेलं आभाळ तरी,
लढणं तुझ्या हातात आहे.
नवं आभाळ निर्माण करण्याचं,
सामर्थ्य तुझ्या मुठीत आहे.
आराधना गुरव
लढणं तुझ्या हातात आहे.
नवं आभाळ निर्माण करण्याचं,
सामर्थ्य तुझ्या मुठीत आहे.
आराधना गुरव
सगळं कळून जातं.
मनाचं नातं,
मनाशी जुळून जातं.
शब्द नसले साथीला
तरी सारं काही
उमजून जातं.
प्रेमाचं नातं असचं
अचानक जुळून जातं.
आराधना गुरव
पण लाचार होऊ नकोस.
मेलीस तरी चालेल
पण कुणाची शिकार होऊ नकोस. १
वखवखनाऱ्या नजरा
शोधत राहतील तुला.
मोहाच्या एका क्षणापायी
घायाळ होऊ नकोस. २
पैसा, प्रसिध्दी, यश
सारं सारं खुणावेल तुला.
कांचन मृगाच्या या जाळ्यात
अलगद फसू नकोस. ३
तुझं अस्तित्व तूच.
तुझं कर्तृत्व तूच.
तुझा अभिमान तूच.
अन् तुझा स्वाभिमान पण तूच.
म्हणूनच.... राहा सतर्क
वेळ पडली तर
उचल शस्त्र.
तुझ्या उज्ज्वल भवितव्यासाठी
मायाजाळात फसू नकोस.
खरचं.... हारलीस तरी चालेल.
पण लाचार होऊ नकोस.
सौ. आराधना गुरव
पान हळवं असतं.
मनाच्या खोल कोपऱ्यात त्याला
हळूवारपणे जपलेलं असतं.
आराधना गुरव
झोपून घ्यावं तिच्या कुशीत.
आई सारखं सुख मिळत नाही,
इतर कुणाच्याच मिठीत.
आराधना गुरव
काय फरक असतो?
माझं माझं म्हणण्याने,
तुटतात गाठी.
आपलं म्हणण्याने,
जुळतात नाती.
सौ. आराधना गुरव
सहजासहजी उमटतं नसतात.
प्रयत्नांचे डोंगर त्याला,
अव्याहतपणे फोडावे लागतात.
सौ. आराधना गुरव
काळीज चरचर कापत जातो.
विखुरलेल्या नात्यांनाही,
अलगद जवळ घेऊन येतो.
सौ. आराधना गुरव
समाधान म्हणजे काय?
मी पण हसत हसत उत्तर दिलं,
जिथं खाली घालावी लागत नाही मान,
तिथं मिळतं खरंखुरं समाधान.
सौ. आराधना गुरव
व्यर्थ का झुरायचं.
आयुष्याच्या इंद्रधनुष्यात ,
हसत खेळत रंगून जायचं.
सौ. आराधना गुरव
ती हळूवारपणे जपत होती.
भावनांचा गोंधळ सांभाळताना,
मनामनाचं ओझं पेलतं होती.
आराधना गुरव