Tuesday, May 31, 2022

पालवी


 मायेच्या शब्दांची एक फुंकर

आतून जळणाऱ्या प्रत्येक वेदनेचा

दाह कमी करते.

अन् तुमच्या मनातील जिद्दीची पालवी मग

त्या वेदनेतून पुन्हा नव्याने फुटू लागते.

Monday, May 30, 2022

वाटा


 मुक्या शब्दांना कवटाळून 

किती दिवस बसायचं

आपल्या उजेडाच्या वाटा

स्वतःच शोधत

 पुढे चालत राहायचं.

Sunday, May 29, 2022

शिल्पकार


 अंधाराचा चिखल सुद्धा

खुबीने मळता यायला हवा.

त्याच्याशी दोस्ती करता करता

आपल्यातील शिल्पकार घडायला हवा

Saturday, May 28, 2022

अंधार


 कधी कधी अंधारकडूनही 

खूप काही शिकता येतं.

नव्या सूर्याच्या निर्मितीचं रहस्य

जणू या अंधारातच उलगडता येतं

Friday, May 27, 2022

ध्यास


 स्वप्नांचा ध्यास लागला की

मोठमोठ्या अडचणी ही

मुंगी सारख्या लहान वाटू लागतात.

तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी जणू त्या

स्वतःच मागे सरून

तुमचा मार्ग मोकळा करून देतात


Thursday, May 26, 2022

बहर


 मनाने एकदा बहरायचं ठरवलं कीठे

कुठेही अन् कशाही परिस्थितीत

मनसोक्त बहरता येतं.

नव्या आयुष्याचं नवं गाणं मग

आपोआपच ओठांवर येतं


Wednesday, May 25, 2022

शस्त्र


 निर्भयतेेचं शस्त्र हाती घेतलं की

अंधार सुद्धा आपल्याशी

आपसूकच बोलू लागतो.

वेड्यावाकड्या वळणातूनही मग

यशाचामार्ग दिसू लागतो

Tuesday, May 24, 2022

वळण


जिंकण महत्वाचं की 

जगणं महत्वाचं हे कळलं की

आयुष्य सोपं होऊन जातं.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरचं 

प्रत्येक वळण मग

हवंहवंसं वाटू लागतं

Monday, May 23, 2022

खच


 स्वप्नांचा खच तर आजूबाजूला

खूप पडलेला असतो.

मात्र त्यातूनच आपला एखादा तुकडा

अलगद उचलता यावा.

त्याच्या पूर्ततेसाठीच मग

अवघा जन्म जगता यायला हवा.

Sunday, May 22, 2022

समाधान


 किती ही अडचणी आल्या तरी

आपण आपलं आपल्या वाटेने 

पुढं चालत राहावं.

वाटेवरच्या प्रत्येक उन्हात

समाधान शोधून पहावं.


Saturday, May 21, 2022

निर्धार


 बस् आलंच आपलं ठिकाण

आता अजुन थोडच चालायचं आहे.

असं म्हणून निर्धाराने चालत राहायचं

आयुष्याच्या वळणावरचं प्रत्येक आव्हानं

असच ताकदीने पेलायाचं.

Friday, May 20, 2022

दिशा


 पावलांना दिशा मिळाली की

आभाळ अलगद हातात येतं.

तुमच्या मनानेच तुम्हाला मग

नियतीशी दोन हात करण्याचं बळ मिळतं


Thursday, May 19, 2022

पंख


 स्वप्नांना मेहनतीचे पंख लावले की

आभाळ सुद्धा अलगद

उतरून खाली येतं.

मनामनाचं ओझं सुद्धा मग

कापसासारखं हलकं वाटू लागतं


Wednesday, May 18, 2022

अध्याय


 रोज नवा अध्याय घेऊन

नव्याने सुरवात करायची.

उगवता सूर्य कसा का असेना

त्याला आत्मविश्वासाने 

सामोरं जाण्याची तयारी

आपली आपणच करायची

Tuesday, May 17, 2022

पाठलाग


 स्वप्नांचा पाठलाग 

सामर्थ्याने करत गेलो की

वाटेतील अडथळे ही

 आपोआप कमी होतात.

प्रत्येक दिवशी

 तुमची ओंजळ

यशाच्या सुगंधी फुलांनी

 भरून टाकतात.

Monday, May 16, 2022

वाट


 त्याच त्या धुरकटलेल्या, मळकटलेल्या

वाटेवरुन चालण्यापेक्षा

थोडंसं वाट बदलून पहावं.

येतील ते अडथळे पार करत

इतरांसाठी आपणच प्रेरणादायी ठरावं.

Sunday, May 15, 2022

गड


 स्वप्नांपर्यंत घेऊन जाणारा रस्ता

आपोआप कुठे बनतो

तो तर बनवावा लागतो.

तेव्हा कुठे अडचणींवर मात करत

प्रत्येक गड जिंकता येतो

Saturday, May 14, 2022

वसंत


 फुलतो आहे दारी आता

रोज नव्याने वसंत.

यशाच्या सोनेरी किरणांनी

आता तेजाळतो अवघा आसमंत


Friday, May 13, 2022

भरारी


 घे भरारी अशी पुन्हा की

गगनाला ही हेवा वाटावा.

यशाचा अमूल्य ठेवा

अलगद तुझ्या हाती यावा

Thursday, May 12, 2022

वाटचाल


 रस्त्यात खाचखळगे आले की समजावं

आपली वाटचाल

 तत्वानुसार आहे सुरू.

एक ना एक दिवस या वाटेनेच

 वेगाने धावेल

तुमच्या यशाचा वारू.

Wednesday, May 11, 2022

स्वप्न


 स्वप्न बघण्यापेक्षा

प्रत्येक क्षणी ते स्वप्न

जगता यायला हवं.

प्रश्न नसतातच मुळी अवघड

फक्त उत्तर मिळेपर्यंत

प्रयत्न करायला शिकायला हवं


Tuesday, May 10, 2022

सूर्योदय


आता शिशिर सुद्धा नव्याने

 बहरण्याचा मूक संदेश देतो.

जणू अंधाऱ्या रात्रीनंतर होणाऱ्या

सूर्योदयाचे गोड गुपित सांगून जातो.


Monday, May 9, 2022

इतिहास


 जगण्याकडे एक लढाई म्हणून बघितलं की

प्रत्येक क्षणाचा इतिहास बनतो.

वेदनेचा प्रत्येक क्षणही मन

मनाला गारवा देऊन जातो

Sunday, May 8, 2022

चांदणं


 आत्मविश्वासाचं पारडं जेव्हा

हळू हळू जड होऊ लागतं.

यशाच्या चांदण्यांनी तेव्हा

आभाळ आपोआपच भरू लागतं


Saturday, May 7, 2022

आभाळ


 दाटलेल्या हुंदक्याला

आतल्या आतच आवरावं

भरून आलेलं आभाळही

हसत हसत सावरावं

Friday, May 6, 2022

गुलमोहर


 वाटेत जितक्या अडचणी येतील

तितकचं मोठं यश पदरात पडतं

आयुष्य तेव्हा मग वैशाखात ही

गुलमोहरासारख फुलतं



Thursday, May 5, 2022

जगणं


 मरण समोर दिसतं म्हणून

आजचं जगणं का सोडायचं.

त्यापेक्षा हातात मिळालेला प्रत्येक क्षण

आनंदाने जगून आपलं आणि इतरांच

जगणंही सुंदर करायचं

Tuesday, May 3, 2022

ऊर्जा


 दिवस करतो घात तेव्हा

अंधार साथ देतो.

नवचैतन्याने पुन्हा बहरण्यासाठी तो

तुमची ऊर्जा बनतो

पाऊल


 पडून उठायला शिकलं की

पावलांना आपोआपच गती येते

यशाच्या सुगंधी फुलांनी मग

तुमची ओंजळसुद्धा अलगद भरते.

Monday, May 2, 2022

अक्षयतृतीया


अक्षय सुखाची पर्वणी

सकलांनी रोज अनुभवावी

सुख समाधानाची वारी

अखंड चालू राहावी.

संपाव्या काळोखाच्या राती

उजळाव्या आशेच्या ज्योती

धरूनी कास नाविन्याची

गोडी वाढावी अक्षय तृतीयेची


Sunday, May 1, 2022

विसावा


 विसाव्याचा क्षण आला की

आनंदाने विसावा घ्यावा.

सामर्थ्याने पुन्हा नव्याने

ध्येयाचा किनारा गाठावा

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही