सरता वैशाख वणवा
येई सृष्टीस बहार.
कष्टातूनच फुलतो
अवघा सुखाचा संसार.
अर्नदिप
क्षितिजा पल्याड तू झेप घ्यावी.
तुझ्या नजरेतील अंगार बघूनच
संकटांनाही घेरी यावी.
अर्नदिप
ही असू शकते चूक.
पण आपली वाट चुकत आहे
हे समजूनही मुद्दाम त्याच वाटेनं जाणं
ही असते विकृतीची भूक.
ही विकृतीची भूक वाढत वाढत जाते
ती वाढत जाताना आपल्या पापाचं
पारडं जड जड करत जाते.
अर्नदिप
बघता बघता एका क्षणात विरून जातं.
इतरांसाठी जगता जगता
स्वतः साठी जगायचं तेवढं उरून जातं
अर्नदिप
कधी थोड्या अवघड वाटेनं ही चालून बघावं.
त्या वाटेने चालताना
येईल तो अनुभव गाठीशी बांधून
पुढे जात राहावं.
अर्नदिप
विकार सगळे सोडून दया म्हणतो.
रात्रीच्या गर्भात जसा उषःकाल उगवतो
तसेच सामर्थ्य अंगी बाणवावे
प्रत्येक संकटातून बोध हाच देतो.
अर्नदिप
निराशा सारी झटकुन दया म्हणतो.
नव्या दमाने नव्या उमेदीने,
स्वागत उगवतीचे करण्या शिकवतो.
अर्नदिप
संघर्षाचे दिवस येतात आयुष्यात
त्यातूनच मार्ग काढत पुढे जायचं.
येणारा क्षण कसा का असेना
त्याचं हसतमुखाने स्वागत करायचं.
अर्न
विकारांना दूर सारायचे.
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाकडून
रोज नवे काहीतरी शिकायचे.
अर्नदिप
ज्याला त्यालाच शोधावं लागतं.
वाट तर सारेच दाखवतात.
पण योग्य वाट निवडून त्या वाटेने
एकट्यालाच चालावं लागतं.
अर्नदिप
पण तो स्वतः च फसत असतो.
बऱ्या वाईट कर्माचा हिशोब
ज्याचा त्यालाच द्यावा लागतो.
वेळ जाते निघून आणि हाती पश्र्चाताप उरतो.
मृगजळमागे धावताना माणूस स्वतः च अडकून बसतो.
अर्नदिप
अवघं आकाश मुठीत घेता येतं.
योग्य दिशेने चालणाऱ्या पावलांना
तेव्हा यश सुद्धा अलगद कवेत घेतं.
अर्नदिप
रोज अंगणात व्हावी.
सुख समृद्धीची किरणे
रोज दारात पडावी.
दूर व्हावी सारी निराशा
ओठी सदा हसू यावे.
अक्षय सुखाचे वारे
तुमच्या अंगणी वहावे.
रिती ओंजळ भरावी
दान सुखाचे घेऊन
अक्षयतृतीया अंगणी यावी.
अर्नदिप
अख्खं आयुष्य बदलून जातं.
विचाराने वागण्याचा अवकाश
केलेल्या प्रत्येक कष्टाचं चीज
यश रूपाने ओंजळीत येऊन पडतं.
अर्नदिप
अडचणींचे अवघड डोंगरही फोडून काढत.
आणि अडचानिंशी खेळता खेळता
यशाचं फूल अलगद ओंजळीत येऊन पडतं.
अर्नदिप
जेव्हा रस्ताभर पसरत
क्षितिजाच्या पलिकडचं आकाशही तेव्हा
अलगद नजरेच्या टप्प्यात येतं.
अर्नदिप
डाव नवे मांडायचे.
हार जीत तर होतच राहते.
हारण्याला घाबरून
नव्याने जगणे का सोडायचे?
अर्नदिप
हे ज्याचं त्यालाच समजायला हवं.
सूर्य अस्तास जाण्याआधी च
सूर्योदयाच दर्शन व्हायला हवं.
अर्नदिप