Thursday, June 30, 2022

सूर्य


 कितीही थकलं तरी

जो अविश्रांतपणे

आपल्या वाटेने चालत राहतो.

यशाचा सूर्य फक्त

त्याच्यासाठीच उगवतो

Wednesday, June 29, 2022

पाऊलखुणा


 आपल्या स्वप्नांच्यापूर्तीसाठी वाटा

आपल्या आपणच शोधाव्या लागतात

तेव्हा कुठे आपल्या यशाच्या 

पाऊलखुणा उमटतात.



Tuesday, June 28, 2022

पाऊल


 एकदा का चालण्यासाठी

पावलं तयार झाली की

वाटेतील खाच खळग्यांची 

वाटत नाही भीती.

म्हणूनच तर पावलांना

आपोआपच येऊ लागते गती






Monday, June 27, 2022

मन


 काळानुसार निडर झालेलं मन

ऋतुचक्रातील कोणत्याच बदलांना 

घाबरत नाही.

म्हणूनच की काय

कोणतीच वेदना त्याच्या आता

थाऱ्याला सुद्धा उभं रहात नाही

Sunday, June 26, 2022

मळा


 मनात नेहमी फुलावा

आनंदाचा मळा.

जाणवत नाहीत तेव्हा मग

वेदनांच्या कळा


Saturday, June 25, 2022

जग


 आजूबाजूचं शांत जग

आजकाल मला खरंच आवडू लागलय.

कारण त्या शांत जगामुळेच तर मला 

नवा सूर्य शोधण्याचं गुपित कळलय.

Friday, June 24, 2022

ऋतु


 पानगळ असो की वसंत

प्रत्येक ऋतु हसत हसत

झेलता आला की

आयुष्य सुखकर होऊन जातं.

पेलता न येणारं ओझं ही मग

चुटकीसरशी हलकं वाटू लागतं.

Thursday, June 23, 2022

मावळती


 मावळतीकडेही सकारात्मकतेने

बघता आलं की

रणरणत्या उन्हातही आयुष्य

गुलमोहरासारख फुलून येतं.

आयुष्यातील प्रत्येक क्षणाच

तेव्हा आपोआपच सोनं होतं.


Wednesday, June 22, 2022

वेग


 फार वेगात पळता नाही आलं तरी चालेल

पण रोज थोडं थोडं का होईना

चालत राहायचं.

वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणीला तोंड देत

मनात रुजलेल 

स्वप्न पूर्ण करायचं.

Tuesday, June 21, 2022

वाटा


 भेगाळतील वाटा

विझतील दिवे.

 आधाराचे ही निखळतील दुवे.

वाट मात्र तुझी तुलाच 

आता चालायला हवी.

यशाची मालिका अखंड

 चालू ठेवायला हवी.

Monday, June 20, 2022

सोबत


 सोबत दिसणारी

सोबत असतातच असं नाही.

सोबत नसणारी

दूर असतातच असं नाही.

दिसण्या आणि असण्यातच

खरंतर खूप फरक असतो.

हाच फरक समजून घेऊन

आपला मार्ग आपणच ठरवायचा असतो.

Sunday, June 19, 2022

ओंजळ


 पाऊल आणि मन

दोन्हीही आता थकत नाही.

कारण त्यांनाही आता माहित झालंय

प्रामाणिक प्रयत्न करतो

त्याची ओंजळ कधीच रिती रहात नाही

Saturday, June 18, 2022

उजेड


 अंधारात ही उजेडाचं

स्वप्न घेऊन जगायचं.

आपल्या स्वप्नपूर्तीसाठी

आपणच उजेड पेरत राहायचं

Friday, June 17, 2022

शब्द


 शब्द असतात सोबतीला म्हणून

कोणत्याच अंधाराची वाटत नाही भीती.

म्हणून तर माझी ओंजळ

कधीच रहात नाही रिती.


Thursday, June 16, 2022

सामर्थ्य


 सामर्थ्याने प्रयत्न केले की

नशीब सुद्धा हसू लागतं.

स्वप्नपूर्तीच दान मग

आपोआपच ओंजळीत येऊन पडतं

Wednesday, June 15, 2022

ऊन सावली


 सावलीच्या साथीने ऊन येणारच

त्याच्या चटक्याला कशाला घाबरायच

सावलीप्रमाणे उन्हाशीही मैत्री करून

त्याच्या हातात हात देऊन चालत राहायचं


Tuesday, June 14, 2022

उमेद


आयुष्यातील प्रत्येक क्षण

नव्या उमेदीने जगायचा.

आजूबाजूच्या प्रत्येकाच्या मनातही

असाच सकारात्मकतेचा विचार पेरायचा.

Monday, June 13, 2022

प्रवाह


प्रवाहित राहायचं असेल तर

आधी प्रवाहात उडी मारायला शिकावं.

कोडी काय उलगडतातच की

कधी ना कधी.

आपण फक्त संयम बाळगून राहावं


Sunday, June 12, 2022

आशा


 नव्या दिवसाची सुरवात

मनात नवी आशा घेऊनच करायची.

समृद्ध विचारांची शृंखला

अखंडपणे मनात खोलवर जपायची


Saturday, June 11, 2022

किरण


 दाटून येतो अंधार जेव्हा

कुठून अचानक आशेचा

एक किरण उगवतो.

तुम्ही पेरलेल्या प्रत्येक स्वप्नासाठी

सुखद, सुखकर मार्ग बनवतो

Friday, June 10, 2022

भरारी


 घे भरारी पुन्हा अशी की

प्रत्येक दिशेला हेवा वाटावा.

तू जगलेल्या प्रत्येक क्षणाने

एक नवा इतिहास रचावा

Thursday, June 9, 2022

ऊर्जा


 खरंतर वेदनेच्या प्रत्येक क्षणाची

मनात खोलवर साठवणूक करावी.

कारण त्या प्रत्येक क्षणातूनच तर मिळते

उंच भरारी मारण्यासाठी ऊर्जा नवी.


Wednesday, June 8, 2022

वाटा


 कर्तृत्व उजळू लागलं की

त्याचा दरवळ आपोआपच

 सगळीकडे पसरतो.

दूर गेलेल्या वाटांनाही मग

हलकेच जवळ घेऊन येतो.

Tuesday, June 7, 2022

स्वप्न


 स्वप्न पहावी माणसाने

पुन्हा पुन्हा पहावी

या स्वप्नांमुळेच मिळते

जगण्याला उभारी नवी

Monday, June 6, 2022

वसंत


 फुलून येते बाग नव्याने

जेव्हा मनात वसंत फुलतो.

आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचे

पुन्हा नव्याने सोने करतो.

Sunday, June 5, 2022

वसंत


 मनात नव्याने फुलतो आता

रोजचं हसरा वसंत.

मनास म्हणुनी वाटतं नाही

आता कशाची खंत

Saturday, June 4, 2022

पाऊल


 आत्मविश्वासाने प्रत्येक पाऊल टाकलं की

यशाची पायवाट आपोआप सुखद होऊन जाते

अडचणी होतात दूर अन्

यशाच्या फुलांनी

तुमची ओंजळ भरली जाते


Friday, June 3, 2022

गुलमोहर


रणरणत्या उन्हातही

गुलमोहरासारखं फुलावं

आयुष्य कसं का असेना

त्यातून सकारात्मकतेच बीजच उगवावं

Thursday, June 2, 2022

वाट


 आव्हान पेलायला मन जेव्हा तयार होत

तेव्हा  मोठ्या वादळात ही मन स्थिर राहतं

दुःख विसावतं उंबऱ्याच्या बाहेर

अन् सुखाला घरात जाण्याची वाट दाखवतं.

Wednesday, June 1, 2022

स्वप्न


 स्वप्नांचा ध्यास लागला की

ती स्वप्न झोपू देत नाहीत

आणि जी स्वप्न झोपू देत नाहीत

ती सत्यात उतरल्याशिवाय राहात नाहीत

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही