विश्वासाने जोडलेली नाती
फक्त विश्वासावर च टिकून राहतात.
एकदा का विश्वास तुटला की
फक्त नात्यांच्या समिधाच हाती राहतात.
अर्नदिप
फक्त विश्वासावर च टिकून राहतात.
एकदा का विश्वास तुटला की
फक्त नात्यांच्या समिधाच हाती राहतात.
अर्नदिप
साऱ्यांच्याच वाटा उजळून द्यायच्या.
भडकायला आपण टेंभा थोडी आहोत?
निरांजनातील मंद अन् शांत ज्योत बनून
अखंड प्रेमाच्या ज्योतीच फुलवायच्या
अर्नदिप
त्यालाच वाट दाखवण केव्हाही चांगलं.
आणि ज्याला खड्ड्यात पडायचं च आहे
त्याला जास्त समजावत न बसता
त्याच्या पासून लांब राहणं चांगलं.
नाहीतर त्याला मार्ग दाखवता दाखवता
आपण भरकटून बसतो.
तो तर बुडतो च सोबत
आपल्या लाही घेऊन बुडवतो.
अर्नदिप
हे वेड झाल्याशिवाय कळत नाही.
आणि वेड होऊन काम केल्याशिवाय
इतिहासाच्या पानावरती आपलं नाव उमटतं नाही.
अर्नदिप
नाते जपुया स्नेहाचेअन् प्रेमाने विश्वास वाढवूया.
इंद्रधनूशी रंगांनी परस्परांचेआयुष्य सजवूया.
हर्षित मनाने होळीचा सण साजरा करू या.
अर्नदिप
कुणीच कधी मोठं होत नसतं.
मोठं व्हायचं असेल तर
स्वतः च आत्मटीकाकार बनून
मनात अखंड खोदत जावं लागतं.
अर्नदिप
चाचपडत, खुरडत का बसायचं.
स्वतःच बनायचं दिवा
अन् इतरांना मार्ग दाखवत राहायचं.
अर्नदिप
फक्त एकच करायचं.
आयुष्यात येणारी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर
त्याचं हसू बनून झळकायच.
अर्नदिप
हसत हसत घालवला की
भविष्यात येणारा प्रत्येक दिवस
सुखाची पखरण करत आणि
हास्याचे तुषार उडवत उगवतो.
अर्नदिप
अलगद तुजला घेईन जाईल.
क्षण क्षण मग का झुरायचे?
हाती लागेल आयुष्य जितके
तिथं आनंद वाटतं राहायचे.
अर्नदिप
कणाकणाने बहरत जावे.
आयुष्यातील प्रत्येक क्षणावर
मनापासून प्रेम करावे.
नकोच गुलामी भावनांची
अन् नकोच चाकरी वेदनांची
सप्तरंगी आयुष्याला
इंद्रधनू बनवीत जावे.
आवुष्यातील प्रत्येक क्षणाला
हसत हसत उत्तर द्यावे.
अर्नदिप
आपण मात्र जोडत राहायचं.
प्रेमाच्या वर्षावात अखंड
प्रत्येक नातं फुलवत राहायचं.
अर्नदिप
माणसानं किमान मन तरी मोठं करावं.
मित्र असो, शत्रू असो, सखा असो, वैरी असो
सगळ्यांवर सारखचं प्रेम करायला शिकावं.
अर्नदिप
प्रत्येक आव्हान पेलण्याचं.
फक्त थोड तंत्र आत्मसात कराव लागत
वेदना हसत हसत झेलण्याचं.
अर्नदिप
हसायला शिकल पाहिजे.
वाट्याला जसं येईल आयुष्य
तसं ते जगायला शिकल पाहिजे.
अर्नदिप
वसंतातील नव्या बहराची चाहूल.
आयुष्यातील एखाद्या गोष्टीचा शेवट म्हणजे
अशाच नव्या सुखद गोष्टीची
सूरवात करणार पाहिलं पाऊल.
अर्नदिप
मुठभर वाळुसाठी
रडत का बसायचं.
पुन्हा नव्याने मूठ भरण्यासाठी
नव्या जोमाने अन्
नव्या उत्साहाने हसत हसत सज्ज व्हायचं.
अर्नदिप
खूप काही शिकता येतं.
ऊन, वारा, पाऊस असे
टक्केटोणपे सहन करतही
आयुष्य स्थितप्रज्ञ रीतीने
जगता येत.
अर्नदिप
माणुसकीचे बंध जपावे.
नदी, झाड अन् सूर्यासारखे
निस्वार्थ भावनेने फक्त देत जावे.
कुणी ठेवेल आठवण ,कुणी जाईल विसरून.
आपण मात्र फक्त आपल कर्तव्य करत राहावे.
अन् प्रत्येकाच्या मनात एक
सुखद आठवण बनून
आयुष्यभर घर करून राहावे.
अर्नदिप
ढळू द्यायचं नाही चित्त.
मगच शांतपणे विचार करत
आयुष्य जगता येत बिनधास्त.
अर्नदिप
आयुष्याशी होईल संध्याकाळ.
जरा आजूबाजूला नजर टाकून बघ
तुला कवेत घेण्यासाठी तयार आहे
एवढं मोठं आभाळ.
रोजचा दिवस तुझा असेलच असं नाही.
धर हिम्मत अन् फक्त लढत राहा.
तुझ्यातला आत्मविश्वास तुलाच
आता जगा करायला हवा
रोज उगवेलच असे नाही.
क्षितिजाकडे झेपावणाऱ्या पावलांना
प्रत्येकवेळी दिशा दाखवणार कुणी
भेटेलच असे नाही.
आपण आपल एकचं करायचं.
मातीत पाय रोवून घट्ट उभ राहायचं.
अन् आलेल्या वादळाला हसत हसत पीत राहायचं.