Thursday, September 29, 2022

हिरवा रंग


 हिरवा रंग चुड्याचा

आयुष्यातील प्रत्येक पाऊल 

सावधगिरीने टाकण्याचा.

हिरवा रंग निसर्गाचा

अंगभरून समृध्दी मिरवण्याचा.

हिरवा रंग स्वाभिमानाचा

अन् हिरवा रंग सर्जनशिलतेचा.

उल्हासाने अन् सामर्थ्याने

मार्गक्रमण करण्याचा.

हिरवा रंग आठवणींचा

मोरपिसाप्रमाणे जपण्याचा

हिरव्या रंगाची नवलाई

सृष्टीस अवघ्या नवचैतन्य देऊ


Wednesday, September 28, 2022

रंग पिवळा


 रंग पिवळा हळदीचा

साज लेवूनी सौभाग्याचा

आनंदाने नटण्याचा.

रंग पिवळा 

लेवुनी फुलतो

गंधित करतो

 सोनचाफा

पिवळी हसरी सूर्यफुले

रानी डुलती आनंदाने

उल्हासाचा अन् मैत्रीचा

संदेश देण्या

येई रंग पिवळा जीवनात


Tuesday, September 27, 2022

निळा रंग


 रंग निळा सागराचा

अंतरंगात लपलेल्या 

अथांगतेचा.

रंग निळा आकाशाचा

बाहुत सामावलेल्या

व्यापकतेचा.

रंग निळा शांतीचा

सर्वांशी सद्भावनेने

 वागण्याचा.

निळी निळाई रंगाची

अनुभवाने चाखायची


Monday, September 26, 2022

लाल रंग


 रंग लाल संघर्षाचा

धैर्याचा अन् नावीन्याचा.

रंग लाल सूर्योदयाच

नम्रपणाने अस्तालाही

हसत सामोरे जाण्याचा.


Sunday, September 25, 2022

रंग पांढरा


 रंग पांढरा शांतीचा

सत्याचा अन् न्यायाचा.

वाट चालुनी या मार्गावरी

इतिहास रचुया न्यायप्रियतेचा

Thursday, September 22, 2022

क्षण


 विस्कटलेला प्रत्येक क्षण

पुन्हा खुबीने गोळा करायचा.

त्या प्रत्येक अनुभवातून

काव्यरुपी मोत्यांचा

 सुरेख हार गुंफायचा.


Wednesday, September 21, 2022

रस्ता


 कोडी सुटत नाहीत

सारे रस्ते ही बंद होतात.

तेव्हा स्वतः च

 नवीन रस्ता बनवण्यासाठी

आपले हातपाय आपोआप हलू लागतात

Tuesday, September 20, 2022

अध्याय


 जिथं सगळचं संपलं असं वाटतं

तिथूनच नव्याने सुरवात करावी.

नव्या एखाद्या अध्यायाची आपणच

मग पेरणी करावी.


जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही