Tuesday, August 30, 2022

गणेशोत्सव


 झेपावया क्षितिजाकडे

पंखात या बळ दे नवे.

सामर्थ्य दे तू चहूबाजूंनी

कुणी असो नसो

सदा संगतीला

धरून चलती जे सन्मार्गाला

हे गणराया तू 

साथ दे तयांना.


Sunday, August 14, 2022

स्वातंत्र्य दिन


 जगणे आमचे अर्पण भारता

मरणे आमचे अर्पण भारता

जगण्या मरण्या मधले अंतर

ते ही अर्पण फक्त भारता.

तिरंगा आमचा फडकत राहो

राष्ट्रगीत ते सदा निनादो

सर्वस्व आम्ही आमचे वाहू

सदैव तुजला भारत देशा

जगणे आमचे अर्पण तुजला

मरणे आमचे अर्पण तुजला

Saturday, August 6, 2022

मैत्री


 हवं तेव्हा हवं तितकं

मनसोक्त बोलता यावं.

प्रत्येकाच्या आयुष्यात

मैत्री नावाचं पण

सदैव हिरवाईने नटलेलं असावं

मैत्री


 हवं तेव्हा हवं तितकं

मनसोक्त बोलता यावं.

प्रत्येकाच्या आयुष्यात

मैत्री नावाचं पण

सदैव हिरवाईने नटलेलं असावं

Thursday, August 4, 2022

उत्सव


 हिरवाईच्या उत्सवात बहरता येतं

तसचं वैशाखात ही बहरता यावं.

प्रत्येक ऋतुत मिळणारं दान

आनंदाने गोड मानता यावं

Wednesday, August 3, 2022

उत्सव


 बाहेर उत्सव थेंबाचा

आत कोसळती जलधारा.

गूज खोलण्या मनाचे

शब्द धरतात फेरा.


Tuesday, August 2, 2022

जगणं


 सोडून द्यायला शिकलं की

जगणं सुंदर होऊन जातं.

समाधानाचा सुगंध ते मग

आपोआपच आजूबाजूला पसरवून देतं

 


पायवाट


 प्रकाशाने पायवाट उजळत नसेल तर

आपण स्वतःच दिवा बनावं.

आपल्या बरोबर इतरांचं ही

जीवन उजळून टाकावं

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही