Saturday, July 31, 2021

मैत्री


 एक हात विश्वासाचा.

एक हात मायेचा.

एक हात सहकार्याचा.

एक हात सामर्थ्याचा.

एक एक धागा गुंफून

मळा फुलतो मैत्रीचा.

    आराधना

Friday, July 30, 2021

घरट


 कितीदा मोडल तरी ,काडी काडी जमवून

चिमणी घरट आपलं विणत राहते.

स्वाभिमानाने जगण्याचा जणू मुक

संदेशच देत राहते.

Thursday, July 29, 2021

प्रयत्न


 शरीरान थकलं तरी

मनानं थकून चालणार नाही.

आकाश मुठीत घेण्याची जिद्द असेल तर

छोट्या छोट्या आव्हानांना घाबरून

घाबरून मैदान सोडून पळून चालणार नाही.

                        आराधना                      

Wednesday, July 28, 2021

निर्धार


 ठाम निर्धाराच्या पायावर

यशाची इमारत उभी राहते.

अथक प्रयत्नांच्या जोरावर

यशाने आपली ओंजळ भरत जाते.

                        आराधना

Tuesday, July 27, 2021

आव्हान


 सत्य, न्यायप्रियता अन् सचोटी

यांची ताकद असते खूप मोठी.

या ताकदीच्या जोरावरच

मोठमोठ्या आव्हानांशी सुद्धा

सहज करता येते दोस्ती.

                         आराधना

 

Monday, July 26, 2021

यश


 यश मिळणं न मिळणं

हा नशिबाचा भाग असतो.

आपण फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत रहायचं.

अन् आपल्या प्रयत्नांपुढे नशिबाला च

गुडघे टेकायला लावायच.

                   आराधना

Sunday, July 25, 2021

अस्तित्व


 स्वतः च वेगळं अस्तित्व निर्माण करणारे

दिवसरात्र प्रामाणिकपणे धडपडत असतात.

ज्यांच्या डोळ्यात ते खुपत ते मात्र

सतत समोरच्याला मुद्दाम टोचत राहतात.

                                 आराधना

Saturday, July 24, 2021

आकाश


 निराशेचे मळभ झाले दूर

अन् जुळू लागले यशाच्या संगीताचे सूर.

दूर नाही आकाश आता

जणू हेच सांगण्यासाठीच आला होता

संकटांचा महापूर.

                     आराधना

Friday, July 23, 2021

वाट


 चढ उताराची वाट

आयुष्यभर चढावी अन् उतरावी लागते.

तेव्हा कुठे यशाचे आकाश

स्वच्छ निरभ्र अन् मोकळे होते.

                         आराधना

Thursday, July 22, 2021

गुरु


 योग्य वाट दाखवतो तो गुरु.

खरं जगणं शिकवतो तो गुरू.

धीर देतो तो गुरू.

अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद देतो तो गुरु.

म्हणूनच गुरु असावा नेटका

त्याने न करावा दगा फटका.

शिकवणुकीने त्याच्या

 तुमच्या यशाचा झेंडा

अवघ्या जगी रहावा फडकता

                          आराधना


Wednesday, July 21, 2021

सर्जा राजा


 सर्जा राजाच्या जोडीने

शिवार मोत्याने भरल.

ऋण फेडाया त्याचं

साजरा करू बैलपोळ्याचा सण.

              आराधना


Tuesday, July 20, 2021

स्वाभिमान


 स्वाभिमानान जगताना त्रास हा होणारच

म्हणून आत्मसन्मान गुंडाळून ठेवायचा नसतो.

एक दिवस आपला नक्की येणार

अन् विजय सत्याचाच होणार

म्हणूनच तर आयुष्यभर सत्याच्या कास धरून राहायचं असतं.

                                       आराधना

Monday, July 19, 2021

विठू माऊली


 विठू सावळा सावळा

त्याचा साऱ्यांनाच लळा.

पंढरपुरी भक्तांचा

अवघा भरला हा मेळा.

 नाम तुझे यावे ओठी.

जन्म माझा हा अवघा

जावा तुझ्या चारणापाशी.

संग तुझा नित्य लाभावा

अवघा देह विठ्ठल व्हावा.

मुखातून या सदा

विठ्ठल विठ्ठल गजर व्हावा.

विठ्ठल विठ्ठल गजर व्हावा

         आराधना

Sunday, July 18, 2021

वादळ


 येणारं प्रत्येक वादळ अन्

होणारा प्रत्येक घाव

काही ना कशी शिकवून जातो.

प्रत्येक प्रसंगाशी लढण्या साठी

जणू दहा हत्तींच बळ देतो.

                  आराधना

Saturday, July 17, 2021

धीर


 वेळ प्रत्येकाची येत असते

आपण फक्त धीर धरून राहायचं.

सचोटीने जगण्याचं सूत्र मात्र

आयुष्यभर पाळायच.

                 आराधना

    

Friday, July 16, 2021

सामर्थ्य


 आधाराच्या कुबड्या फेकून दिल्या की

स्वसामर्थ्याचे अनेक पर्याय दिसू लागतात.

प्रामाणिक प्रयत्न केले की

यशाचे दरवाजे आपोआपच खुले होतात.

                     आराधना

Thursday, July 15, 2021

अनुभव


 आयुष्यातील प्रत्येक क्षण

काही ना काही शिकवत असतो.

सामर्थ्याने जगण्याचा

जणू कानमंत्रच देत असतो.

             आराधना


Wednesday, July 14, 2021

यश


 यश मिळो न मिळो

आपण फक्त प्रयत्न करत राहायचं.

येणाऱ्या प्रत्येक अनुभवाच्या आधारे

पुढे जात राहायचं.

                                 आराधना

Tuesday, July 13, 2021

यश


 जी पाखरे अपयशाच्या बुजगवण्यांना घाबरून

संधीच्या शेतात उतरत नाहीत.

त्यांना यशाचा हुरडा

कधीच चाखायला मिळत नाही.

Monday, July 12, 2021

विश्वास


 स्वतः वर विश्वास असेल तर

वादळ वाऱ्यातही नौका सहज तरुन जाते.

मनात पाहिलेल्या स्वप्नांचे गणितही मग

चुटकी सरशी सुटू लागते.

                  आराधना

Sunday, July 11, 2021

मन


 मन तोकडं झालं की

विचारही खुजे होतात.

म्हणून मन नेहमी सागरा प्रमाणे विशाल असावं

म्हणजे विचारही आकाशाप्रमाणे व्यापक होतात.

                               आराधना

Saturday, July 10, 2021

धुकं


 मनात साठलेल धुकं दूर झालं की

सारं आभाळ स्वच्छ वाटू लागतं.

उंच आकाशात झेपावण्याच स्वप्नही मग

पुन्हा मनात फेऱ्या मारू लागतं.

                            आराधना

Friday, July 9, 2021

आभाळ


 आभाळ येतं भरून कधीतरी

तेव्हा त्याला मनसोक्त बरसून द्यायचं असतं.

आभाळ बरसून गेल्यानंतरच नवचैतन्य

आपल आपणच अनुभवायचं असतं.

                                 आराधना


Thursday, July 8, 2021

सामर्थ्य


 आपलं सामर्थ्य आपल्यातच लपलेलं असतं

तेच अचूक हेरायचं.

आत्मविश्वासाच्या जोरावर

पुढे चालतं राहायचं.

                 आराधना

Wednesday, July 7, 2021

ओंजळ


 नकोच कुणाचा द्वेष अन् 

मनात कुणाबद्दल कधीच अढी नसावी.

नवचैतन्याने माझी ओंजळ

सदा भरलेली राहावी

                 आराधना

Tuesday, July 6, 2021

झेप


 जिथे पराभव होतो

तिथूनच नव्याने सूरवात करायची.

निर्धाराने उभं राहून

पुन्हा उंच आभाळी झेप घ्यायची.

                       आराधना

Monday, July 5, 2021

सत्य


 सत्य खरच खूप कटू असतं

कदाचित म्हणूनच ते मनात खोलवर आघात करतं.

पण मन जेव्हा सत्य स्वीकारत

तेव्हा नव्या उमेदीने पुन्हा जगायला तयार होतं.

                                   आराधना

Sunday, July 4, 2021

मन


 मन खंबीर असलं की

अडचणींचे डोंगर सुद्धा सहज पार करता येतात.

नवनवीन आव्हान झेलण्याच सामर्थ्य

या अडचणीचं आपल्याला देतात.

                          आराधना

   


Saturday, July 3, 2021

चांदणं


 चैतन्याचं चांदण हल्ली

रोजचं दारात पसरत

माझ्या प्रामाणिक प्रयत्नांची

जणू पोहोच पावतीच देऊन जातं

                         आराधना

Friday, July 2, 2021

समाधान


 हातात काही असो किंवा नसो

समाधानी राहता आलं पाहिजे.

इतरांना काही देता आलं नाही तरी

त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी

हसू फुलवता आलं पाहिजे.

                        आराधना

Thursday, July 1, 2021

सुख


 सुख येतं चिमणीच्या पावलांनी

तेव्हा अख्खं घर आनंदाने डोलू लागतं.

यशाच्या पाऊल खूणांनी मग

घरातलं प्रत्येक आभाळ भरून वाहू लागतं.

                               आराधना


जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही