Friday, November 20, 2020

मैत्री


 आयुष्यरुपी कुपीतील

सुगंधी अत्तर म्हणजे मैत्री.

डोळे झाकून विश्वास ठेवावा

असं हक्काच माहेर म्हणजे मैत्री.

धागा धागा विणत जातो.

संवादाच्या क्षणांनी

मैत्रीचा मार्ग फुलत जातो.

साथ देते ती मैत्री.

हात देते ती मैत्री.

आयुष्यभर मित्रासाठी जळत राहते.

अशी समई तील वात म्हणजे मैत्री.

म्हणूनच जपूया 

हा मैत्रीचा अनमोल ठेवा.

तेव्हा कुठं अनुभवता येईल

मैत्रीतील सुखद गारवा.

             आराधना

6 comments:

  1. मैत्रीचा गारवा छान च मॅडम👌👌👌

    ReplyDelete
  2. सर्वांचे खूप खूप आभार

    ReplyDelete
  3. मैत्रीबद्दल खूपच छान लिहिले आहे,त्याबद्दल आपले अभिनंदन 👌👌👌👌👍👍👍👍👍

    ReplyDelete

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही