उसळणाऱ्या लाटेबरोबर
असंख्य फुगवतटे तयार होतात
अन् क्षणात नाहीसे होतात
संथ लयीत वाहणारे पाण्याचे थेंब
म्हणूनच तर कायम आपलं अस्तित्व
जपत राहतात.
म्हणूनच वेगानं येणारी लाट बनण्यापेक्षा
छोटासा थेंब बनून राहायचं
आयुष्याच्या समुद्रात
आपलं अस्तित्व कायम स्वरुपी सिद्ध करायचं
No comments:
Post a Comment