Saturday, March 19, 2022

ऊन


 


ऊन



आजूबाजूचं प्रत्येक ऊन

अलगदपणे झेलता यावं.

कधी आलीच सावली मदतीला तर

तिला ही लडिवाळपणे पेलता यावं.

फार काही करता आलं नाही तरी

आयुष्याचं रितं झालेलं माप

आपलं आपल्यालाच भरता यावं


No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही