हारलीस तरी चालेल
पण लाचार होऊ नकोस.
मेलीस तरी चालेल
पण कुणाची शिकार होऊ नकोस. १
वखवखनाऱ्या नजरा
शोधत राहतील तुला.
मोहाच्या एका क्षणापायी
घायाळ होऊ नकोस. २
पैसा, प्रसिध्दी, यश
सारं सारं खुणावेल तुला.
कांचन मृगाच्या या जाळ्यात
अलगद फसू नकोस. ३
तुझं अस्तित्व तूच.
तुझं कर्तृत्व तूच.
तुझा अभिमान तूच.
अन् तुझा स्वाभिमान पण तूच.
म्हणूनच.... राहा सतर्क
वेळ पडली तर
उचल शस्त्र.
तुझ्या उज्ज्वल भवितव्यासाठी
मायाजाळात फसू नकोस.
खरचं.... हारलीस तरी चालेल.
पण लाचार होऊ नकोस.
सौ. आराधना गुरव

प्रेरणादायी
ReplyDeleteखूप छान 👍
ReplyDelete