Friday, February 18, 2022

शिवजयंती


 सह्याद्रीच्या कुशीतून

अचानक एक सूर्य उगवला.

संघटन करून मावळ्यांचे

स्वराज्यस्थापनेचा विडा उचलला.

राज्य उभारले समतेचे अन्

प्रत्येकाच्या मनात भगवा फडकला.

इतिहास सदैव साक्ष देईल.

तुमच्या पराक्रमाची गाथा 

अनादी अनंतापर्यंत

मनाचा ठाव घेतच राहील.

शिवछत्रपती होणे न दुसरा

महाराज तुम्हाला मानाचा मुजरा.

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही