चार ओळी तुमच्यासाठी
लिहिताच नाही आल्या.
शब्द ही झाले कातर
अन् पापण्या ओल्या झाल्या.
बाग गेला सुकून
आता बहर मागवा कोणाकडे
बहरण्यासाठी अमृत देणारा
झरा च आटून गेला.
पुन्हा नव्याने फुटो पालवी
अन् बहर पुन्हा तो येवो.
विचार सुमनानी तुमच्या
आमचा कणकण गंधित होवो.
अर्नदिप

No comments:
Post a Comment