Thursday, March 3, 2022

वाट


 आजूबाजूचे मूल्यांचे दिवे

जेव्हा विझून जातात

तेव्हा आपल्या मनात मात्र विचारांची

बारीकशी ज्योत प्रज्वलित करायची

तिच्या हलक्या प्रकाशातच मग

आपली वाट आपणच शोधत राहायची

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही