कुठला सूर अन् कुठला ताल
आज सारेच एकटे पडले
गहिवरल्या डोळ्यातील
अश्रूही वहात सुटले.
प्रत्येक सूर जणू
आज मुका झाला.
हृदयात आपसूक
हुंदका दाटून आला.
वेड लावले जगास साऱ्या
ते सूर आज का थांबले?
स्वर कोकिळेचे विधात्या
का हिसकावूनी घेतले?
तार तुटली सतारीची
अन् संगीत पोरके झाले.
सप्त स्वरांनी तुम्हाला
अमरत्व बहाल केले.
संगीत साधना संपली तरी
सूर निनादत राहतील.
आम्हां भारतीयांची मने तुम्हाला
सदैव गुणगुणत राहतील.
घडावा चमत्कार पुन्हा
अन् शारदा पुन्हा जन्माला यावी
गान कोकिळा पुन्हा नव्याने
भारत भूवरी अवतरावी
सौ आराधना गुरव
������
ReplyDeleteखूपच कविता आवडली . . . कविता फडतरे
ReplyDelete