Saturday, February 13, 2021

श्वास


 माझ्यात रूजण्या आधी मी

तुझ्यात रुजून जावे.

गीत बनावे श्वासाचे अन्

हृदयाने मंद सूर छेडावे.

धडधडावे ह्र्दयात तुझ्या

लकेर बनुनी प्रेमाची.

प्रत्येक क्षणी चाहूल लागावी,

तुला माझी अन् मला तुझी.

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही