Monday, January 25, 2021

प्रजासत्ताक दिन


 जगणे आमचे अर्पण भारता.

 मरणे आमचे अर्पण भारता.

जगण्या मरण्या मधले अंतर

तेही अर्पण फक्त भारता.

तिरंगा आमचा फडकत राहो.

राष्ट्रगीत ते सदा निनादो.

सर्वस्व आम्ही आमचे वाहू

सदैव तुजला भारत देशा

जगणे आमचे अर्पण तुजला.

मरणे आमचे अर्पण तुजला.

                  आराधना (अर्णदिप)

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही